Archive for सप्टेंबर, 2010

मार्केटिंग ही एक कला आहे की शास्त्र आहे? यावर तज्ञांमध्ये बरेच मतभेद आहेत…राहतील…परंतू हल्लीच्या युगात मार्केटिंग ही फक्त एक आवश्यकता नव्हे तर गरजच झाली आहे. आपले प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचावे यासाठी प्रत्येक कंपनी सतत काहींना काही उपाय योजत असते, मार्ग शोधीत असते…वेगवेगळया माध्यमांचा यासाठी उपयोग केला जातो. सध्या इंटरनेटमुळे नवनवीन इनोवेटिव कन्सेप्ट्स राबविणे [...]

गौरीपूजन, महालक्ष्मी, दुर्वाष्टमी जेथे ज्ञान असते तेथे समृद्धी वसते. ज्ञान तेथे समृद्धी हे त्रिकालाधित सत्य आहे. हेच सूत्र आपल्याला भाद्रपद महिन्यात दिसून येते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण ज्ञानाचा देव म्हणून गणपतीची पूजा करतो, पंचमीला आपल्याला ज्ञान देणाऱ्या ऋषींची पूजा करतो पाठोपाठ अष्टमीला समृद्धीदेवता महालक्ष्मी, गौरीची पूजा करतो. प्राचिन काळी महिषासूर आणि बेलासूर या राक्षसांचा महालक्ष्मीने [...]

ऋषीपंचमी फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या ऋषीमुनींबद्दल आकर्षण आहे. अतीव आदर आहे. अशा या श्रेष्ठ, जेष्ठ, ज्ञानी ऋषींबद्दल आपणास वाटणारा आदर, निष्ठा, भक्ती व्यक्त करणे हेच ऋषीपंचमीचे प्रयोजन आहे. गणपतीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया रजस्वला अवस्थेत असताना अजगातेपणी केलेल्या स्पर्शाचा दोष दूर [...]

गणेश चतुर्थी (गणेशोत्सव) अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. ह्या ज्ञानाच्या देवाचे म्हणजेच गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते. या चतुर्थीस ‘गणेश चतुर्थी’ म्हणतात. प्रत्येक चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी, कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टी व मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीना विशेष महत्व आहे. यादिवसाबद्दल पुराणांमध्ये बऱ्याच कथा [...]

हरतालिका आपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत. त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात. हरतालिकेला नदी वा समुद्रातून वाळू आणून मैत्रीण, पार्वती वं तीन शिवलिंगाची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करतात. या दिवशी [...]