Posts Tagged ‘इंटरनेट’

इंटरनेटचे लहान मुलांवर दुष्परिणाम ह्यावर एक फार मोठा ग्रंथ सहज तयार होईल. या विषयावर अनेक तास चर्चाही करता येईल. पण या जगात अशीही काही लहान मुले आहेत ज्यांनी या माध्यमाचा एक व्यवसाय म्हणून विधायक उपयोग केला आणि आता ते भावी पिढीचे एक नवीनच प्रकारचे आदर्श बनले आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी तुम्ही काय करत होता? किंवा तुम्हाला [...]

काल इंटरनेटवरचा बराचसा वेळ बऱ्याचजणांचे खो वाचण्यात गेला. टाईमपाससाठी छान कल्पना आहे…काल महेंद्रकाकाकडून श्रीकृष्ण सामंतानी स्वत:हून खो घेतला. हे त्यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षीचे इनिशेटीव व उत्साह पाहून मीही प्रेरित झालो व आता त्याच्याकडून स्वत:च खो घेऊन आता ही खोखोगीरी खेळत आहे. आज १५ ऑगस्ट भारताचा ६३ वा स्वातंत्र्य दिन..त्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आपल्या सर्वांना आहेतच. [...]

तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे. आजकाल इंटरनेट ही एक गरज झाली आहे. हल्ली जवळजवळ प्रत्येक ठीकाणी इंटरनेटचा वापर केला जातो. बँक्स्,शॉपिंग, शिक्षण, उद्योगधंदे, संगीत अशा नानाविवीध ठीकाणी इंटरनेट अत्यावश्यक झालेले आपण बघतो, वापरतो. पण आपल्यापैकी फारच कमी जणांना इंटरनेटबद्दल माहीती असेल. इंटरनेट हा नक्की काय प्रकार आहे व तो केंव्हा, कोणी व कसा सुरु केला. हे जर तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात (फक्त आठ मिनीटात) जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक अफलातून शैक्षणिक विडीओ झम्प्या येथे शेअर करित आहे. त्याचा जरूर लाभ घ्यावा. झम्प्याचा फंडा : ह्या विडीओची जर तुम्ही पारायणे केलीत तर उद्या अचानक इंटरनेट्बद्दल काही बोलायची [...]