नमस्कार मित्रांनो मागील लेखात म्हटल्याप्रमाणे येथे मी मराठी ब्लॉग, ब्लॉगर्स व ब्लॉग माझा या स्पर्धेविषयी माझे काही विचार मांडत आहे. काही आपल्याला पटतील तर काही नाही. पण विचारांपेक्षा वा शब्दांपेक्षाही माझा हेतू तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करतो. स्पर्धा व परीक्षकांबद्दल स्टार माझाच्या ब्लॉग माझा या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष. म्हणजेच या वर्षी स्टार माझाच्या [...]
Posts Tagged ‘Maharashtra’
ब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा
Posted: नोव्हेंबर 29, 2010 in झम्प्या झपाटलेला, ब्लॉग आणी ब्लॉगर्सTags: झम्प्या झपाटलेला, ब्लॉग, blog, blog maza, Languages, Maharashtra, Marathi language, star maza
त्रिपुरी पौर्णिमा….आपले सण समजून घ्या
Posted: नोव्हेंबर 22, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, झम्प्या झपाटलेला, Hindu, Hinduism, Maharashtra, Religion and Spirituality
त्रिपुरी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानात जे दीपस्तंभ (उंच दगडी दिवे) असतात ते सुद्धा [...]
पितृपक्ष (सर्वपित्री अमावस्या)….आपले सण समजून घ्या
Posted: ऑक्टोबर 7, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, झम्प्या झपाटलेला, हिंदू, Gods and Goddesses, Hinduism, India, Maharashtra, Marathi language, Religion and Spirituality
भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक [...]
गणेश चतुर्थी (गणेशोत्सव)….आपले सण समजून घ्या
Posted: सप्टेंबर 10, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, गणेश चतुर्थी, गणेशोत्सव, झम्प्या झपाटलेला, ganesh chaturthi, Ganesha, ganeshotsav, God, Gods and Goddesses, Hindu, Hinduism, India, Maharashtra, Religion and Spirituality, zampya
गणेश चतुर्थी (गणेशोत्सव) अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. ह्या ज्ञानाच्या देवाचे म्हणजेच गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते. या चतुर्थीस ‘गणेश चतुर्थी’ म्हणतात. प्रत्येक चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी, कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टी व मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीना विशेष महत्व आहे. यादिवसाबद्दल पुराणांमध्ये बऱ्याच कथा [...]
रक्षाबंधन…. आपले सण समजून घ्या
Posted: ऑगस्ट 24, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, झम्प्या झपाटलेला, नागपंचमी, पवित्रारोपण, पौर्णिमा, रक्षाबंधन, राखी, संदेश, स्त्री, हिंदू, Maharashtra
रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा. श्रावणशुद्ध पौर्णिमेस राखी बांधतात. शास्त्रात यास ‘पवित्रारोपण ‘ असे देखील म्हणतात. महाराष्ट्रात जरी फक्त भावालाच राखी बांधण्याची प्रथा असली तरी इतरत्र पतीला, शत्रूला, नोकर मालकाला राखी बांधण्याची देखील परंपरा आहे. राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. [...]


