Posts Tagged ‘Religion and Spirituality’

त्रिपुरी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानात जे दीपस्तंभ (उंच दगडी दिवे) असतात ते सुद्धा [...]

तुळशीचे लग्न (तुलसी विवाह) कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला चातुर्मास व्रत समाप्त होते. एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत मुख्यत्वे द्वादशीला श्रीविष्णूचा तुळशीसी विवाह साजरा करण्याची पध्दत आहे. तुळस हि घराघरात असणारी एक पवित्र व उपयुक्त वनस्पती आहे. आपल्या हिंदू संस्कृतीने तर तिला मानवाचा दर्जा बहाल केला आहे. ती बहुगुणी व ओषधी आहे. देवपूजा व श्राद्ध यामध्ये [...]

पहाटेच्या आंघोळी घरासमोर रांगोळी नको चिंता कपाळी खुश सगळी पोरं बाळी आली आली हो दिवाळी पावसाळा संपून  हिवाळा सुरु झालेला असतो. सगळीकडे सुगीचे दिवस असतात. थंडीचे साम्राज्य सुरु झालेले असते. दिवस छोटा तर रात्र मोठी…त्यामुळे थंडीबरोबर अंधाराचासुद्धा पगडा वाढणार असतो. पण निसर्गाच्या या संक्रमण अवस्थेचे भय न बाळगता अखिल हिंदू संस्कृती पणत्या, मेणबत्ती, आकाशकंदील व [...]

‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसरा हा मोठा सण मानला जातो. नवरात्र संपले की दशमीला दसरा उजाडतो. आश्विन महिन्यातील शुद्ध दशमीस हा सण साजरा करतात. दसरा हा सर्व कार्यांना शुभ मानला जातो. या दिवशी नवे कार्य करण्याची प्रथा आहे. दसऱ्याला विजयादशमी असेदेखील म्हणतात. विजयादशमीला  सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजीतापूजा व शस्त्रपूजा [...]

भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक [...]