झम्प्या(च) का व कशासाठी


नमस्कार मित्रांनो हा माझा पहिलाच ब्लॉग. बरेच छान छान मराठी ब्लॉग्स बघून मलापण ही ब्लॉगबाधा झाली. पण मग लिहावे तरी कशावर आणी काय हा प्रश्न? माझे आयुष्य किंवा मीही त्या उंचीला पोहचलो नाही की उगाचच त्यावर शब्द उधळावेत्. वर हीही जाणीव की आपले लिखाण काही ह्या दर्जाचे नाही की आपण काहीही लिहावे आणी इतरांनी ते वाचावे. मग लिहावे तरी काय की जेणेकरून लोक वाचतील्..मोठे प्रश्नचिन्ह. (प्रश्न : इतरांनी माझा ब्लॉग वाचण्याचा इतका अट्टाहास का? उत्तर : फक्त स्वतःसाठी म्हणून ब्लॉग लिहीण्यावर माझा विश्वास नाही त्यापेक्षा मी साधी डायरी लिहीन्. टायपिंगची मेहनत कशाला घेवु ? )

म्हणून एक अभ्यास सुरु केला इतर ब्लॉग्सचा..की लोक वाचतात तरी काय काय? आणी काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या..

त्या अशा…मराठीतले बरेचसे ब्लॉग्स हे पर्सनल (खाजगी) आहेत. म्हणजे स्वानुभावावर रचलेले. स्वतःला जे वाटले पटले ते मांडणारे. काही कथा, कविता, चारोळ्यांना वाहिलेले. तर काही जीभेचे आणी पोटाचे लाड पुरविणारे. पण हल्लीच्या संगणक, इंटरनेट, टेक्नॉलॉजीच्या युगात या विषयांना वाहीलेले फारच कमी ब्लॉग्स मला सापडले. जे कोणी हे ब्लॉग्स चालविताहेत ते बिचारे आपले इतर उद्योगधंदे सांभाळून हे शिवधनुष्य पेलत आहेत. त्यामुळे तिथेही आनंदच आहे. आठवडा पंधरवडा झाला तरी नविन पोस्ट्स येत नाहीत. ( अपवादात्मक कोणी असेल तर मला कळवा. अशा बहाद्दराला फॉलो करायला मनापासून आवडेल. )

इंग्रजीत या विषयांवर असंख्य ब्लॉग्स आहेत मग आपणच यात मागे का?

ठरले.  इंटरनेटच्या या विशाल समुद्रात खोल खोल शिरायचे आणी जे जे मोती हाती लागतील त्यांना मराठीत पैलू पाडून तुमच्यापुढे मांडायचे. मुख्य विषय वर दिल्याप्रमाणे संगणक, इंटरनेट, टेक्नॉलॉजी हे तर असतीलच बरोबर धाडसी उद्दयोजक आणी त्यांच्या उद्दयोगधंद्यांविषयी माहीती देवून तुम्हाला चावी देण्याचा प्रामाणिक प्रयत्नपण असेल. आणी इतरही जे काही मौल्यवान हाती लागेल ते ते वेळोवेळी तुमच्यासमोर पेश केले जाईल. मग त्या प्रेरणादायी कथा असोत वा सुंदरशा कविता असोत. (मराठी माणसाचे पहिले प्रेम ) अपेक्षा एकच येथे तुम्हाला जे जे मिळेल ते ते तुम्ही पुढे पुढे देत चलावे.

आता येवुया नावावर.. मी झम्प्या झपाटलेला हेच नाव का घेतले. मला लोक झम्प्या म्हणून चिडवतात का? तर उत्तर नाही हे आहे.

आपल्याकडे काही टोपननावे तशी खूप लोकप्रिय आहेत. जसे गोटया, पिंट्या, सोन्या, राजा, जाड्या वगैरे

यातली बरीचशी नावे लहानपनापासूनच चिटकतात तर काहीजण मोठेपणी आपल्या कतृत्वाने काही पदव्या कमावतात उदा. ढापन्या, बोबड्या, गधड्या, बेवड्या वगैरे

तर काहीजण आपल्या वेंधळेपणा,मुर्खपणा,विसराळूपणा अशा नाना पणांमुळे पण खास पदव्या मिळवतात. त्यातलेच एक (पदवी म्हणा किंवा टोपननाव म्हणा ) झम्प्या.

हल्लीच्या सुपरफास्ट जगात यातली बरीचशी नावे इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. पण कदाचीत झम्प्या याला अपवाद असू शकतो. जर तुम्ही आपल्या आजुबाजुला नजर मारली तर एखादा तरी झम्प्या तुम्हाला सापडल्यावाचून रहाणार नाही. आणी म्हणूनच झम्प्या. झम्प्या हे नाव मराठीत बर्‍यापैकी लोकप्रिय आहे आणी महत्त्वाचे म्हणजे लक्षात ठेवण्यास फार सोपे आहे म्हणून झम्प्या.

पण हा झम्प्या नेहमीप्रमाणे साधासुधा नाहीए बरका… तो आहे झम्प्या झपाटलेला. आता त्याला कशाने झपाटलेले आहे त्यासाठी एक स्वत्रंत्र पान रचले आहे कृपया त्याला भेट द्यावी. आणी आता तो आलाय तुम्हाला झपाटायला…तेंव्हा…या झपाटून जा……

प्रतिक्रिया
 1. चेतन सुभाष गुगळे म्हणतो आहे:

  झम्प्या झपाटलेला,

  मी महेन्द्र कुलकर्णींच्या ब्लॊगवरील तुमच्या प्रतिक्रिया वाचल्या. मला त्या अतिशय पटल्या. माझ्या ब्लॊगवरही तुम्ही जरूर भेट द्यावी (सोबत लिंक देतोय) व तेथील लेखांवर आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात.

  तुमचे लिखाण इतरांना पटलेले दिसत नसले तरी मला ते अतिशय आवडले असून विचारपूर्वक लिहील्यासारखे वाटते.

  धन्यवाद.

  CHETAN SUBHASH GUGALE
  Plot # 86, Sector # 25, Nigdi,
  Pimpri – Chinchwad New Town,
  PUNE – 411 044. MAHARASHTRA, INDIA
  Telephone (Res.) +912027650728 / +919921337197
  Mobile (Direct) +919552077615
  chetangugale@gmail.com
  Read:- http://www.blogger.com/profile/11964142182953111712

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   चेतनजी सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद..
   तुमच्या प्रोफाइलवरून तुमच्या ब्लॉग्सला भेटी दिल्या..थोडे ब्लॉग अजूनही शिल्लक आहेत वाचायचे..
   तुमचे लेख वाचले..बापरे…अतिशय प्रामाणिकपणे सांगतो इतके सुंदर,मुद्देसूद व गरजेचे लिखाण आतापर्यंतच्या माझ्या ब्लॉग वाचनात तरी आले नव्हते…महेंद्रजीच्या ब्लॉग वर प्रतिक्रिया दिल्यामुळे इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वशी ओळख झाली..ह्या इतकी चांगली गोष्ट दुसरी नाही.
   तुमचे लिखाण खूपच वरच्या दर्जाचे आहे..इथे अनेक थर्ड क्लास विचारांना रिलेजीअसली फॉलो करणारे भरपूरजण आहेत(करमणूक हा त्यांचा हेतू असेल कदाचीत)
   पण तुमच्यासारखे खूप कमी त्यपेक्षा मी म्हणीन नाहीतच इथे …तुमचे विचार रयतेपर्यंत पोहोचवण्याची नितांत गरज आहे..मी माझ्या परीने त्याचा निकराने प्रयत्न करेन असा तुम्हाला शब्द देतो.

   शेवटी एक विनंतीही आहे.
   तुम्ही अनेक ब्लॉगवर वेगवेगळे लिहिण्यापेक्षा एकाच ब्लॉगवर का नाही लिहीत..जेणेकरून ते वाचकाला खूपच सोयीचे होईल.

 2. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

  झंप्या आज प्रथमच तुझ्या (एकेरी उल्लैख चालेल ना) ब्लॉगला निवांतपणे भेट दिली.काही ठिकाणी कमेंटावस वाटुन देखील आमच्या आळशीपणामुळे म्हणा कि कं ची कायमची बाधा असल्याने म्हणा कमेंटता आल नाही म्हणुन इथे ही प्रतिक्रिया.असच लिहत मित्रा..खरच झपाटलस रे तु…

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   देवेंद्र एकदाचे कमेंटल्याबद्दल खूप खूप आभार रे….
   कोणीही मला एकेरीनेच हाक मारावी य हेतूनेच मी झम्प्या हे नाव घेतलंय रे….झम्प्या म्हणजे….तो एक खूप हक्काचा शब्द आहे…म्हणूनच फक्त एकेरी…

 3. Gayatri म्हणतो आहे:

  Baaki naav zakkas aahe raao tumch……..!!!!!!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s