झम्प्याबद्दल


झम्प्या झपाटलेला.

म्हट्ले तर थोडाफार तुमच्यासारखा म्हट्ले तर बराचसा भरकटलेला.

भरकटलेला? म्हणजे काय रे भाऊ? आता कस नि काय काय सांगू.

( मला पण नाही माहीत.. वापरला हा शब्द आपला.. उगाच यमक जुळवायला..हा हाहा )

असो.. नाद आहेत भरपूर झम्प्याला.

पुस्तके, चित्रपट, इंटरनेट सदैव सोबतीला.

बुद्धीबळातील मोहरे झम्प्याच्या दिमतीला.

सदाकदा झम्प्या त्यांच्यातच डुंबलेला.

जसा डुक्कर असतो गटारात घुसलेला (ई शीssss किती घाण..त्यापेक्षा..)

जसा भुंगा असतो कमळात अडकलेला ( हे चालेल ना? )

कधी कधी कवितापण करतो.. पक पक पकवायला.

जालात हुंद्ड हुंद्ड हुंदड्तो वेळ घालवायला.

मानतो झम्प्या आळ्शीपणाला. आवडते त्यास गाढवासारखे लोळायला.

पुरे झाली हो एवढी टीका. चढवतो आता जरा झम्प्याला.

शिक्षण झालेले आहे पुर्ण जरी बसला दोनदा बारावीला. (शूssss)

हुशार म्हणून मिरविला नेहमी जरी मार्कस नव्हते दिमतीला

खूप वेळ लावला त्याने स्वता:ला ओळखायला. स्वता:च्याच कोशातून बाहेर पडायला.

अनेकानी केली मदत तेव्हा लागले त्याला समजायला

माणूस म्हणून जेथे आपण जन्म घेतला

देणे लागतो आपण त्या समाजाला

देण्याघेण्याचा हा डाव रंगला

रंगता रंगता इतका रंगला

त्याने माझ्यातल्या झम्प्याला झपाटला.

प्रतिक्रिया
 1. Kiran म्हणतो आहे:

  Mahendrajinchya blogvar apali comment vachali. Dhanyavad..

 2. pramodkakde म्हणतो आहे:

  खरच सांगतो राव !!!! आपल्याला झंम्प्याचा झपाटलेपना लय आवडला ……

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   अतिशय धन्यवाद….प्रमोदजी….तुमाच्यासारख्यांच्या प्रोत्साहनाची ह्या सुरवातीच्या काळात झम्प्याला खूप गरज आहे…
   एक शंका आहे…
   प्रमोदजी तुम्ही ते पत्रकार प्रमोद काकडेच आहात का?

 3. vikram म्हणतो आहे:

  Jhapatun lihit raha aamhi vachat rahu 🙂

 4. चांगली वेबसाईट बनवलीस झंप्या …
  चाल हो पुढे सगळ्यांना झपाटून टाक

 5. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

  ऒळख छान करुन दिली आहेस…

 6. Ajay म्हणतो आहे:

  baryach jananna jhapatles

  ajun asa kahitar lihiki indiala jhapat

  pudhil likhana sathi ”SHUBHECHCHA !”

  jhap jhap jhap jhap jhapaaaaaaaaaaatttttttttttttttttttttttttttttttt

  Dhanyavad sir

 7. Hiraman Patil म्हणतो आहे:

  झंप्या ची स्टोरी लायी भारी आहे राव.

  झंप्या keep it up re dada 🙂

 8. Prashant म्हणतो आहे:

  Hello Sir, mi marathi blogs cha naveen vachak aahe. kahi dusare time-pass blogs me vachalet, pan tumacha blog jara hat-ke aahe. Tumche kahi lekh vachlet aani te kharach vichar karanyasarakhe aahet. mazya manat blog lihayacha asata, tar me hi asach lihala asata.
  Aapalya vishayee adhik mahiti kuthe milali nahi, pan nakkich tumhi management field madhye asal.
  Khup khup dhanyavad aani shubhechya.
  [BTW, how to type in Marathi script :-)]

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   प्रशांत ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
   सुरवातीला काही दिवस मीही तुमच्यासारखाच एक नवीन वाचक होतो. जसे तुम्ही म्हणालात ‘जर कधी ब्लॉग सुरु केलात तर असच लिहिले असते.’ अगदी अशाच विचारांनी मीही हा ब्लॉग सुरु केलेला. त्यामुळे तुम्हीही असा ब्लॉग सुरु करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो.
   माझ्याबद्दलची थोडीफार माहिती तुम्हाला http://wp.me/p10n1c-dy येथे वाचावयास मिळेल.

 9. Nachiket म्हणतो आहे:

  ब्लॉगमधला तज्ञ म्हणून मदतीसाठी तुझ्याकडे आलो आहे.

  माझ्या ब्लॉगवर कॉमेंटस मधले ओळीच्या शेवटचे शब्द / अक्षरे डिसप्ले होत नाहीत. ते खाल्ली जातात. कॉपी पेस्ट करून तो मजकूर दुसरीकडे डकवला तर मात्र सर्व शब्द दिसतात. उदा म्हणून लिंक देतो:

  http://gnachiket.wordpress.com/2010/11/30/%e0%a4%b8%e0%a4%a1%e0%a4%95%e0

  त्यात कोणतीही कॉमेंट बघ. तन्वीची (सहजच )कॉमेंट पाहिली तर वाक्य आहे:

  “नव्या रंगढंगातल्या जुन्या वास्तूंमधे उगाच आपण काहितरी ओळखीचे शोधत रहातो!! ”

  आणि दिसतंयः

  “नव्या रंगढंगातल्या जुन्या वास्तूंमधे उगाच आपण काहितरी रहातो!! ”

  मला टॅम्प्लेट बदलायचं नाहीये.. काय घोळ होतोय?

 10. झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

  नचिकेतसाहेब मला तज्ञ म्हणू नका हो…माझी अवस्था ‘ज्याक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन’ अशी आहे…असो

  तुमचा ब्लॉग त्यावरील प्रत्येक लेख व त्यावरील प्रत्येक कमेंटवर मी जातीने लक्ष ठेऊन असतो…नेहमीच 😉 … त्यामुळे तुम्ही म्हणताय तसे तर कधी माझ्या बघण्यात आले नाही. पण तुम्ही दिलेल्या लिंकवरून पुन्हा एकदा चेक केले मला तरी सर्व व्यवस्थीत दिसले, म्हणून मी मोझिला, इंटरनेट एक्सप्लोरर व गूगल क्रोम या तीनही ब्राऊजरवरून बघितले तरी ती व इतर कमेंटस् व्यवस्थितच दिसताहेत.
  बहुतेक तुमच्या ब्राऊजरचा किंवा सेटिंग्जचा काही प्रॉब्लेम असावा अशी शंका येते..तुम्ही एकदा दुसऱ्या एखाद्या पी सी वर चेक करून बघा. कदाचीत काही नसेल ….पण जर असेल तर नीट पहावे लागेल. कळवा

 11. gayatri म्हणतो आहे:

  Zakkkkkaaaaasssssssss Zampya….:) 😉 😀

 12. nitin more म्हणतो आहे:

  javal asun zanpya la ushira bhetlo. zampya lay bhari.

 13. विनायक पंडित म्हणतो आहे:

  झंप्या! तुमचा ब्लॉग अतिशय आवडला! उशीरा प्रतिक्रिया देतोय, क्षमस्व! माझ्या अनेकानेक शुभेच्छा! 😀

 14. deepak kinjawadekar म्हणतो आहे:

  kharach sangto… vachtana tension nahi

 15. bolMJ म्हणतो आहे:

  अरे दादा कुठे आहेस रे…
  काही अपडेट नाही नवीन लेख नाहीत…
  तुझा हा ब्लोग बघून मी ब्लोग लिहायला प्रेरित झालेलो.
  फार दिवसांनी तुझ्या ब्लॉगची आठवण आलो म्हणून गुगल वर सर्च मारून पोहचलो..परत भारी भारी वाचायला मिळणार म्हणून… पण तू निराश केलास यार …काही नवीन अपडेट नाहीत…
  अरे झंप्या आमच्या सारख्या रसिकांसाठी तर लिहीत जा बाबा…
  बेस्ट ऑफ लक्..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s