झम्प्याचा झांगडगुत्ता..


———————————————————————————————————————————————-

वयात आलेला झंप्या शाळेतून नुकताच घरी आलेला असतो.

तो त्याच्या बाबांना सांगतो, “ सुंदर म्हणजे खूपच खूप सुंदर आहेत आमच्या नवीन शिक्षिका”..

बाबा झम्प्याला म्हणतात,” अरे झंप्या….तुझी शिक्षिका तुझ्या आई सारखी आहे….त्यामुळे असे बोलू नये…”

झंप्या लगेच चिडून बोलतो,,,” बाबा …तुमचं हे नेहमीचं आहे हं जिथे तिथे तुम्ही तुमचीच सेटिंग लावता,,,

———————————————————————————————————————————————-

झम्प्या आणी झम्पी बागेत बसले होते,

झम्पी: मी आई होणार आहे…

झम्प्या: नाssssही असे कसे शक्य आहे?? आपण तर……
झम्पी: ए बावळट तुझ्या बाबांनी मला propose केलं, आता मी तुझी आई होणार आहे…

———————————————————————————————————————————————-

एकदा झम्प्या खचाखच गर्दीने भरलेल्या बस मध्ये बसला होता.त्याच्या शेजारी एक आजी उभी होती.

तिने झम्प्याला हाक मारली, त्याच्या हातात बदाम ठेवले आणि म्हणाली”खा हो बाळ!” झम्प्याने ते लगेच मटकावले.असं वारंवार झाल्यावर तो म्हणाला,”ओ आजी, असे बदाम का वाटताय, तुम्ही का नाही खात?”

आजी म्हणाली,”दात पडले रे माझे सगळे”  “अहो मग बदाम विकत….घेताच का?”

हातातला चॉक्लेटचा पुडा नाचवत आजी म्हणाली,”त्यांच्या भोवतीचं चॉकलेट तर चघळता येतंच ना मला!”

———————————————————————————————————————————————-

कॉलेजात एकदा दारूचे दुष्परिणाम यावर व्याख्यान चालू होते.
एक प्रात्यक्षिक म्हणून वक्त्याने एक दारूने भरलेला ग्लास मागवला आणि त्यात एक जीवंत गांडूळ टाकले.
ते गांडूळ मरण पावले.
त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले,”यावरून आपण काय निष्कर्ष काढाल ?”
मागून आपल्या झम्प्याने आवाज टाकला,”दारूमुळे पोटातले जीवजंतू मरून जातात.”

———————————————————————————————————————————————-

शाळेतला मराठीचा तास..

.

शिक्षक म्हणतात…” जशास तशे या म्हणीचे उदाहरण द्या ..

.

झम्प्या म्हणतो ,.” सर मी तिला भेटायला तिच्या घरी गेलो.. तर ती झोपलेली
होती.. आणि मग जेव्हा ती मला भेटायला आली.. तेव्हा मग मी झोपलो
होतो…जशास तशे .”

———————————————————————————————————————————————-

झम्प्या व चम्प्या हॉस्पिटल मध्ये एकमेकांना भेटतात.

चम्प्या रडत असतो.
झम्प्या त्याला विचारतो, “काय रे का रडत आहेस?”
चम्प्या म्हणतो, “माझी आज ब्लड टेस्ट होती.”
… झम्प्या म्हणतो, “मग?”
चम्प्या म्हणतो, “त्यांनी माझा बोट कापलं.”
हे ऐकताच झम्प्या एकदम रडायला लागतो. चम्प्या त्याला म्हणतो,
“आता तुला काय झाला रडायला?”
झम्प्या म्हणतो, “माझी आज युरीन टेस्ट आहे!”

———————————————————————————————————————————————-

झम्प्या अन चम्प्या शाळेत उशीरा येतात ….

शिक्षक: काय रे चम्प्या उशीर का झाला तुला ?

चम्प्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला
…उशीर झाला ..

शिक्षक: आणि झम्प्या तुला का रे उशीर झाला ??

झम्प्या: सर, मी चम्प्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो ..

———————————————————————————————————————————————-

चम्प्या : काय झम्प्या, कसा झाला कालचा ट्रेनचा प्रवास?

झम्प्या : छे बुवा. फारच त्रास झाला. पाठदुखीमुळे मला अप्पर बर्थ अजिबात चालत नाही. आणि नेमका माझ्या वाट्याला काल अप्पर बर्थच आला.

चम्प्या : अरे, मग लोअर बर्थवाल्याकडून बदलून नाही का घ्यायचा?

झम्प्या : घेणार होतो रे, पण लोअर बर्थवाला आलाच नाही शेवटपर्यंत.

———————————————————————————————————————————————-

प्रतिक्रिया
 1. usha म्हणतो आहे:

  too good …………………. keep it up 🙂

 2. vikram म्हणतो आहे:

  aayala he mi AAWARA var vachale aahe FB chya :O
  he tujhe aahe ka ? mastach 🙂

 3. Ajay म्हणतो आहे:

  good goood very good chalu rahu de

  okkkkkkkkkkkk

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s