Archive for ऑगस्ट, 2010


मंगळागौर

श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रीयांचा सण. सौभाग्यवती स्त्रीयांना आपल्या भावना, संवेदना,आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर.

मंगळागौर ही एक सौभाग्यदेवता आहे. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्वाचे मानले जातात. या वारी पूजा केली म्हणजे जन्माचे सार्थक झाले असा समज आहे. ह्या पूजेसाठी लग्न होऊन पाचपेक्षा अधिक वर्षे झाली नाहीत अशाच सौभाग्यवतीना बोलावण्यात येते. यांना वपोरी-वसोळी म्हणतात. मंगळागौरीच्या व्रतात शंकर, गणपती व गौरीची पूजा करतात.

इस बाई इस दोडका किस,
दोडक्याची फोड लागते गोड.
आणिक तोड बाई आणिक तोड

मंगळागौर जागवताना अशा प्रकारची गाणी म्हणतात.खेळीमेळीच्या वातावरणात म्हणलेली ही गाणी  दु:ख विसरायला लावतात. म्हणतात ना, दु:ख वाटलं तर कमी होतं आणि सुख वाटलं तर ते वाढतं. पूजा करताना वाहिलेली जाई, जुई, शेवंती, मोगरा, नागचाफा, गुलाब, जास्वंद ह्या फुलांमुळे मन प्रसन्न होते. आघाडा, तुळस, कण्हेर, रूई, डाळिंब, अशोक यामुळे निसर्गाशी जवळीक साधली जाते.

पूर्वीच्या काळी फार कमी वयात लग्न होत असत त्यामुळे या कमी वयाच्या मुलींना अशा व्रताच्या निमित्ताने एकत्र  बोलावून त्यांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा हेतू असे.व त्याचबरोबर आपल्या पतीबद्दल, कुटुंबाबद्दल पूज्यभाव जागृत व्हावेत हादेखील उद्देश असे यासाठी रात्रभर जागरण ठेऊन दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून जेवून मुली आपल्या घरी जात असत अशा प्रकारे कौटुंबिक रहाटगाडग्यातून एक दिवस रजा मिळत असे व उत्साहही वाढत असे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

नागपंचमी नारळीपौर्णिमा

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere


रक्षाबंधन

रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा. श्रावणशुद्ध पौर्णिमेस राखी बांधतात. शास्त्रात यास ‘पवित्रारोपण ‘ असे देखील म्हणतात. महाराष्ट्रात जरी फक्त भावालाच राखी बांधण्याची प्रथा असली तरी इतरत्र पतीला, शत्रूला, नोकर मालकाला राखी बांधण्याची देखील परंपरा आहे.

राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत परंतू त्या माहित करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणांच्या हेतूला, उद्देशालाच महत्व देणार आहोत.

आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.

राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.

एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाहे. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

नागपंचमी नारळीपौर्णिमा

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere


मित्रांनो उद्या नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन असे आपले दोन लाडके सण जे एकाच दिवशी येतात. म्हणूनच उद्या एकदम दोन्हीची माहिती देण्यापेक्षा मी विचार केला आज नारळी पौर्णिमेची तर उद्या रक्षाबंधनाची माहिती देऊया. तशी मला आपल्याकडे खास स्त्रियांचा म्हणून जो सण आहे मंगळागौर त्याचीही माहिती द्यायची आहे. बघूया आज जर वेळ मिळालाच तर नाहीतर पुढील मंगळवारी नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

नारळीपोर्णिमा


आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कृतज्ञता वं सहिष्णुतेवर आधारलेला आहे. आपण आपली कृतज्ञतापण सणांच्यामार्फत वाजत गाजत साजरी करतो.आपल्या पूर्वजांनी फार कल्पकतेने सणांची रचना केली आहे.

ज्याच्यामुळे श्रावणात धरती हिरवाईने नटलेली असते. चहूकडे चैतन्याचे झरे वाहत असतात.त्या वरुणाला म्हणजेच जलदेवतेला ते कसे विसरतील? त्याच जलदेवतेप्रती आदरपूर्वक, प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळीपौर्णिमा.

शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. जरी श्रीफळ सागराला अर्पण करावयाचे असले तरी हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे. कोळी समाजाचा आणि सागराचा संबध अतूट असल्याने ते नारळी पौर्णिमा वाजतगाजत, थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून तिच्यात सोन्याचा नारळ (सोन्याचा मुलामा) ठेऊन नाचत, गात अतिशय आनंदाने मिरवणूक काढून समुद्रकिनाऱ्यावर येतात. सूर्यास्ताबरोबर नारळाची पूजा करून दर्या देवताला नारळ समर्पण करतात. वं प्रार्थना म्हणतात. “पर्जन्य वर्षावाने उधाणलेल्या दर्यादेवा शांत हो वं तुझ्या लाटा सौम्य होऊन आमचे वादळ, तुफान इत्यादीपासून रक्षण कर.”

हिंदू धर्मात पूजाविधीत नारळाला फार महत्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळाच्या बहुविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता मिळाली आहे. नारळात अनेक ओषधी गुण आहेत. शरीराचा दाह,उष्णता कमी करण्यासाठी ओले खोबरे खावे. रक्त पडल्यास साखर खोबरे खावे रक्त पडावयाचे थांबते. खोकल्यातून रक्त आल्यास मनुक्याबरोबर खोबरे खावे. ओले खोबरे खाल्ल्यास जास्त तहान लागत नाही. नारळाचे दूध बळ वाढविते. पाणी लघवी साफ करते, तूप अर्धांगावर उपयोगी आहे. तेल केसांची निगा राखते, चोथा सूज उतरवतो तर चोथा जाळून मधातून घेतल्यास उलटी,उचकी थांबते. इतकेच काय तर करवंटीदेखील उगाळून वा पेटवून तव्यावर ठेवल्यास त्याचे जे तेल येते त्याने खरूज नायटयासारखे त्वचारोगही बरे होतात. नारळाच्या झाडाच्या फांद्या व खोडापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात. म्हणूनच माडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.

अशा या नारळी पौर्णिमेचा दुहेरी उद्देश आहे जे व्यवस्थीत समजून घेऊनच आपण हा सण साजरा केला पाहिजे.
पाहिला  उद्देश…

नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा अर्थात वृक्षवल्ली आम्हा सोयरीप्रमाणे झाडे लावा झाडे वाचवा.

व दुसरा उद्देश…

जलदेवता म्हणजेच सागर वं पर्जन्याबद्दल कृतज्ञता बाळगा.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

नागपंचमी रक्षाबंधन

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere


मित्रांनो आज मला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया खरे तर सूचना अशी होती की ह्या ब्लॉगवरील माझी एक पोस्ट एका वाचक मित्राला खूप आवडली. ती त्याला इतरांबरोबर शेअरही  करायची होती पण ती शेअर करण्यासाठी त्याला हवे तसे ऑप्शन तिथे नव्हते.  त्या वाचक मित्राचा ब्लॉग गुगलच्या ब्लॉगरवर असल्याने त्याला तिथे त्याचे लेख शेअर करण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. पण वर्डप्रेस.कॉम असे ऑप्शन्स आपल्याला देत नाही. वर्डप्रेस.कॉम  सुरक्षिततेच्या कारणास्तव आपल्या ब्लॉगवर जावा स्क्रिप्ट रन करायला परवानगी देत नाही. आणि त्यामुळेच आपल्याला आपला लेख इतरांपर्यंत पोहोचवण्यास वा शेअर करण्यास थोड्या अडचणी येतात. हां हल्लीच काही दिवसांपूर्वी वर्डप्रेसने ट्विटरची सोय आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. परंतू  ट्विटरपेक्षा आपल्याकडे फेसबुक, गुगल बझ, याहू बझ, ऑर्कुट हे जास्त लोकप्रिय आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी वर्डप्रेसने ह्यापैकी कोणालाही आपला दरवाजा उघडलेला नाही. पण त्यांनी नाही उघडला म्हणून आपण काय हातावर हात ठेऊन गप्प बसायचे…..नाही नं….म्हणूनच आज ठरविले…आपली पोस्ट जर एखाद्याला आवडली तर त्याला ती तिथल्या तिथे कोणाहीबरोबर, कोणत्याही सोशल साईटवर, कोणत्याही ठिकाणी ताबडतोब शेअर करता आली पाहिजे.

बऱ्यापैकी गुगलिंग केल्यावर मला अनेक उपाय सापडले. त्यातले काही खूप किचकट होते तर काही खूप सोपे पण त्रासदायकही होते. बरेचशे मी ट्रायही केले. शेवटी एक पद्धत मला खूप सोपी आणि सोयीस्कर वाटली ती मी इथे तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. जर तुम्हाला ही सोडून इतर कोणतीही वेगळी पद्धत माहीत असेल तर तुम्हीही ती मला सुचवू शकता.

सध्या मी फेसबुक शेअर, फेसबुक लाईक, गुगल बझ वं याहू बझ यांच्या आयकॉन्सचे एचटीएमएल कोड  इथे देत आहे. ते तुम्ही तुमची नवीन पोस्ट लिहून झाल्यावर त्याच्या खाली फक्त कॉपी पेस्ट करायचे. जुन्या पोस्टवरतीही तुम्ही हे अपडेट करू शकता. मी केले आहेत. तुम्ही ते इथे वं इथे बघू शकता.

ते कॉपी पेस्ट करताना तुम्हाला फक्त एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे तुम्हाला तुमच्या वर्डप्रेसच्या टेक्स्ट एडिटर मधील एचटीएमएल व्ह्यू मध्ये जाऊन हे कोड्स पेस्ट करावे लागतील. घाबरू नका. खूप सोपे आहे. फक्त एडिटरमधील एचटीएमएल व्ह्यूमध्ये जा. कंट्रोल एन्डने सर्वात खाली जा व इथे खाली दिलेले एचटीएमएल कोड्स तिथे पेस्ट करा. बस इतकेच. आता तुमच्या पोस्टची प्रिव्ह्यू पहा. तिथे तुम्हाला सगळ्या लिंक्सचे आयकॉन्स दिसतील. झाले तर मग आता तुम्हीही ब्लॉगरप्रमाणे एका क्षणात तुमची पोस्ट इतरत्र बझ किंवा शेअर करा.

प्रत्येक कोडच्या वर मी तुम्हाला समजण्यासाठी त्या त्या सोशल सर्विसचे नाव देत आहे. तुम्हाला हवी ती सर्विस तुम्ही सिलेक्ट करू शकता.

कॉपी पेस्ट करताना मात्र खालील फक्त एचटीएमएल कोड कॉपी वं पेस्ट करा. वरील नाव नको…नाहीतर एरर दाखवेल.

मित्रांनो खालील पाचही कोड्स तुम्ही एकाखाली एक असेही वा तुम्हाला हव्या त्या क्रमाने कॉपी पेस्ट करू शकता.

Share on Facebook फेसबुक शेअर.

<a title=”Share on Facebook” href=”http://www.addtoany.com/add_to/facebook?linkurl=PASTE-POST-URL&amp;type=page&amp;linkname=PASTE-POST-TITLE&amp;linknote=”><img title=”Share on Facebook” src=”https://zampya.files.wordpress.com/2010/08/facebook.png&#8221; alt=”Share on Facebook” width=”16″ height=”16″ /></a>

Like this at Facebook! फेसबुक लाईक.

<a title=”Like this at Facebook” href=”http://www.facebook.com/plugins/like.php?href=PASTE-POST-URL&amp;show_faces=true&amp;width=450&amp;action=like&amp;colorscheme=light”><img title=”Like this at Facebook!” src=”https://zampya.files.wordpress.com/2010/08/facebook-like-button.jpg&#8221; alt=”Like this at Facebook!” width=”49″ height=”24″ /></a>

Google Buzz गुगल बझ.

<a title=”Google Buzz” href=”http://www.addtoany.com/add_to/google_buzz?linkurl=PASTE-POST-URL&amp;type=page&amp;linkname=PASTE-POST-TITLE&amp;linknote=”><img title=”Google Buzz” src=”https://zampya.files.wordpress.com/2010/08/google-buzz-me.png&#8221; alt=”Google Buzz” width=”16″ height=”16″ /></a>

Yahoo Buzz याहू बझ.

<a title=”Yahoo Buzz” href=”http://www.addtoany.com/add_to/yahoo_buzz?linkurl=PASTE-POST-URL&amp;type=page&amp;linkname=PASTE-POST-TITLE&amp;linknote=”><img title=”Yahoo Buzz” src=”https://zampya.files.wordpress.com/2010/08/yahoobuzz.png&#8221; alt=”Yahoo Buzz” width=”16″ height=”16″ /></a>

Add this anywhere ऑर्कुट वा इतर कोणतीही सर्विस .

<a title=”Add this anywhere” href=”http://www.addtoany.com/share_save?linkname=PASTE-POST-TITLE&amp;linkurl=PASTE-POST-URL”><img title=”Add this anywhere” src=”https://zampya.files.wordpress.com/2010/08/addtoany.png&#8221; alt=”Add this anywhere” width=”16″ height=”16″ /></a>

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere


इतर तिघे भाऊ अभ्यासात हुशार पण याचा आणि अभ्यासाचा मात्र छत्तीसचा आकडा. ते सर्व भाऊ शिकायचे इग्रंजी माध्यमात तर हा होता तामिळ माध्यमात. सदा अभ्यासात मागे राहिल्याने न्यूनगंडही सोबतीला.  पण त्याच्या आवडीनिवडी काहीतरी वेगळ्याच होत्या. पाचवीत वगैरे असेल तो आणि त्याच्याकडे होती ५०० कबुतरे, भरपूर मासे आणि अनेक प्रकारचे पक्षी. आणि त्याचबरोबर आणखीही एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे धंद्याची समज. त्या वयातही तो स्वतःची पॉकेट मनी त्याच्या छोट्याशा प्राण्यांच्या धंद्यातूनच कमवायचा.

त्याच्या वडलांचे नाव होते चिन्नी कृष्णन. ते एक शेतीतज्ञ होते. त्याचबरोबर त्यांचा ओषाधांचाही व्यवसाय होता. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रत्यत्न करीत असत. नवीन कल्पना,नवीन शोध हाच त्याचा ध्यास होता. अशीच एक त्यांना सुचलेली कल्पना म्हणजे पाऊचची(sachet). त्याकाळी टाल्कम पावडर फक्त डब्यातून विकली जायची. त्यांनी ती पाऊचमधून विकायला सुरवात केली. १००/५०/२० ग्रामच्या पाऊच मधून..अशाच प्रकारे ते मीठही विकायचे. त्यांचे म्हणणे एकच होते की माझे उत्पादन (प्रोडक्ट) हे सामान्यातल्या सामान्यापर्यंत पोहचायला हवे. हमालापासून ते रिक्षावाल्यापर्यंत सगळ्यांना परवडले पाहिजे. पाऊचमधून वस्तू विकणे हेच त्यांचे ध्येय होते. भविष्यात वस्तू अशाच विकल्या जातील असेही ते म्हणायचे. पाऊचसारख्या अनेक इनोवेटिव कल्पना त्यांनी राबविल्या पण तरीसुद्धा ते जास्त यशस्वी होऊ शकले नाहीत. कारण एकच…विक्रीची कला त्यांना कधी जमलीच नाही. याच आघाडीवर त्यांनी मार खाल्ला. कोणतेही उत्पादन बनविण्यापेक्षाही ते विकले जाण्यावर त्या वस्तूचे महत्व टिकते हे त्यांच्या लक्षात आले नाही. पण हीच गोष्ट त्यांच्या त्याच मुलाने व्यवस्थीत समजून घेतली व यशस्वीपणे वापरली जो सर्वात अपयशी वं ढ समजला गेला होता.

त्या मुलाचे नाव आहे  सी.के.रंगनाथन. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा व्यवसाय आपोआपोआपच भावांच्या हातात गेला. त्यांनी वेलवेट नावाचा एक शाम्पू तयार केलेला. सी.के. ही त्यांच्याबरोबर काम करू लागला होता. तो शाम्पूचे उत्पादन ज्या युनिटमध्ये व्हायचे तिथेच काम करायचा. पण थोड्याच दिवसात त्याचे व भावाचे काही जमेना. म्हणून एक दिवस त्याने त्यांना रामराम ठोकला.

नुसताच घराला वं व्यवसायाला रामराम नाही ठोकला तर आपल्या घरेलू व्यवसायावरील सगळ्या हक्कांवरही पाणी सोडले. आणि हाच निर्णय त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. खिशात बचत केलेले फक्त १५००० रुपये आणि शून्यातून काहीतरी उभे करायची प्रचंड मोठी जिद्द. ह्या दोन भांडवलावर(?) तो आता काहीतरी करणार होता. काय ते त्याचे त्यालाही माहित नव्हते कारण आत्तापर्यंत फक्त दोनच गोष्टी त्याने केल्या होत्या एक म्हणजे प्राणी पाळणे वं दुसरे म्हणजे शाम्पू बनविणे. खूप विचारांती त्याने दुसरा मार्ग अवलंबिला. २५० रु.महिना जागा भाडे, फॅक्टरी ३०० रु.भाडे, शाम्पू पॅकिंग मशीन ३००० रु. ह्या गुंतवणुकीवर त्याचा धंदा सुरु झाला.

शाम्पूचे नाव वडिलांच्या नावाच्या आद्याक्षरावरून चिक (Chinni Krishnan… CHIK) असे ठेवण्यात आले. धंद्यात पाय रोवायला वर्षभराचा काळ गेला. हा कालावधी खूप काही शिकण्यातच गेला आणि त्याच्याच बळावर दुसऱ्या वर्षीपासून हळूहळू फायदा काय तो दिसायला लागला.  धंदा वाढत होता आणि त्यासाठी आता मोठ्या गुंतवणुकीची पर्यायाने भांडवलाची गरज होती. गहाण ठेवायला काहीही तारण नसल्याने कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नसे. शेवटी तीन वर्षानंतर एका बँकेने कर्ज मंजूर केले. त्याला कारणही तसेच घडले कर्जासाठी दिलेली कागदपत्रे तपासताना बँक मॅनेजरच्या हे लक्षात आले की जरी तारण नसले तरी एक गोष्ट मात्र ह्यांच्याकडे आहे ती म्हणजे गेल्या तीन वर्षाचे इन्कमटॅक्स भरलेले पेपर्स. त्याकाळी कोणतेही असे छोटे युनिट इतके व्यवस्थितपणे इन्कमटॅक्स भरत नसे…ही एकच जमेची गोष्ट ध्यानात घेऊन २५००० रु.चे कर्ज मंजूर झाले…त्याचेच पुढे जाऊन ४ लाख पुन्हा पुढे १५ लाख असे चक्र चालूच राहिले. आणि इथून पुढे चिक( CHIK) शाम्पूला मागे वळून बघायला वेळ मिळालाच नाही. त्यांची वाटचाल दक्षिण भारतातील नंबर एककडे सुरु झाली.

पाच कोणतेही रिकामे पाऊच आणा व एक चिक शाम्पूचे पाऊच घेऊन जा. पाच चिक शाम्पू विकत घ्या सहावा मोफत मिळावा.. अशा एक न अनेक स्कीम्स राबवून विक्री ३५००० रु. महीन्यावरून १२ लाख रु. महिन्यावर गेली. त्यानंतर चिकचे चमेली वं गुलाब असे दोन नवीन सुगंधी शाम्पू बाजारात आले ज्यामुळे महिना विक्री रु. ३० लाखापर्यंत गेली. आणि जेंव्हा जाहिरातीसाठी अभिनेत्री अमलाला करारबद्ध करण्यात आले तेंव्हा तर कहरच झाला गुलाब चिक शाम्पूची विक्री महिना १ करोड रुपयापर्यंत पोचली…जे वडिलांना जमले नव्हते करायला ते त्यांच्या मुलाने करून दाखविले. चिक शाम्पू फक्त नऊ वर्षात दक्षिण भारतातला नंबर एकचा शाम्प्पू झाला.

सध्या ग्रामीण बाजारपेठ शहरी बाजारापेठेपेक्षा दुप्पट वेगाने वाढते आहे. हे सी.के.नी वेळीच ओळखले वं आपले संपूर्ण लक्ष ग्रामीण भारताकडे वळविले. गावागावात त्यांनी आपल्या शाम्पूची प्रात्यक्षिके दाखवायला सुरवात केली. शाम्पू कसा वापरायचा हे देखील शिकविले. त्यासाठी एका मुलाचे शाम्प्पूने डोके धुणे त्याच्या केसांचा सुगंध,स्पर्श इतरांना देणे. असे नाना विविध मार्ग वापरले. त्याचाही होयचा तोच परिणाम झाला विक्री आणखीन ४ पटीने वाढली.

अशा प्रकारे ७ वर्षाचा काळ लोटला. आता शाम्पूशिवाय आणखीही काही प्रोडक्टस असावेत असा रास्त विचार करावयास सुरवात झाली. आणि त्यांचे लक्ष त्यावेळेस शॉ वॉलेसने काढलेल्या हर्बल पावडरकडे गेले. पण योग्य विक्रीकौशल्याभावी त्यांना ते विकता आले नव्हते. याच संधीचा लाभ उठवत सी.के.नी मीरा हर्बल पावडर बाजारात आणली. तिसऱ्याच महिन्यात पहिला नंबर व सहाव्या महिन्यात बाजारपेठेचा ९५ टक्के हिस्सा असे अभूतपूर्व यश मिळविले..उरलेला ५ टक्के हिस्साच काय तो शॉ वॉलेसकडे राहिला.

आता त्यांनी आपला मोर्चा सौंदर्य प्रसाधानांकडे वळवायचे ठरविले. पण त्यासाठी एक योग्य नाव पाहिजे होते म्हणून आपल्याच कर्मचारी वर्गात त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली. नवीन नाव सुचविण्याची. एका कर्मचार्‍याने नाव सुचविले केविनकेअर (CavinKare) ज्यात C आणी K हे कॅपिटल लेटर्स असतील. हे नाव निवडले गेले त्याचे एक कारण म्हणजे ह्यात सी.के. च्या वडिलांच्या नावांची आद्यक्षरे होती.(व त्यांच्या स्वतःच्या पण) वं दुसरे कारण होते तामिळमध्ये केविनचा अर्थ होतो सौंदर्य,ग्रेस.

नाव नक्की झाल्यावर त्यांनी पहिले उत्पादन काढले ते म्हणजे परफ्युम. (मराठीत बहुतेक अत्तर म्हणतात याला) त्याचे नाव होते स्पीन्झ. कदाचित तुम्हीही स्पीन्झ वापरले असेल. दहा रुपयाच्या पॅक मध्ये ते लाँच करण्यात आले. ज्याचा सरळ सरळ उद्देश निन्म मध्यमवर्गीयांना परफ्युम वापरावयास उत्तेजीत करणे हा होता वं जो प्रमाणाच्या बाहेर यशस्वीही झाला. असेच त्यांनी हळू हळू एक एक वेगळे प्रोडक्टस् काढायला सुरवात केली ज्याचे मुख्य उद्दिष्ट होते समाजातील खालच्या स्तरातील लोकांना उच्च प्रतीचे उत्पादन स्वस्तात उपलब्ध करून देणे.

तर अशा या अवघड प्रवासात ,गळेकापू स्पर्धा असलेल्या क्षेत्रात , जिथे लोकांच्या आवडीनिवडी रोज बदलत असतात तिथे इतकी वर्षे आतरराष्ट्रीय कंपन्यांना तोंड देत त्याच दर्जाची कंपनी शून्यातून उभी करून यशस्वीपणे चालवायची हे एक खूप मोठे वं सर्व भारतीयांना अभिमान वाटेल असे काम सी.के.रंगनाथन गेली कित्येक वर्षे मोठ्या जबाबदारीने करीत आहेत.

मित्रांनो आपण नेहमी भांडवल नाही, शिक्षण नाही, ओळख नाही अशा सबबी सांगून स्वत:ची फसवणूक करत असतो. पण जर तुम्हाला खरोखरच काही करायची तीव्र इच्छा असेल तर मार्ग आपोआप तयार होतात हेच सी.के.रंगनाथन यांनी खिशात फक्त १५००० रुपये असताना ५०० करोड रुपये उलाढाल असलेली कंपनी निर्माण करून आपल्याला दाखवून दिले नाही काय? (त्यांचे पुढील लक्ष्य येत्या तीन वर्षात कंपनीची उलाढाल १५०० करोड रुपयांपर्यंत नेणे हे आहे.)

मित्रांनो वरील लेख मी सी.के.रंगनाथन यांच्या ज्या मुलाखतीवरून लिहिला आहे ती मुलाखत जर तुम्हाला वाचायची असेल तर लींक येथे देत आहे.

Share on Facebook

Share

Yahoo Buzz Yahoo Buzz

Google Buzz Google Buzz

Add this anywhere Add this anywhere