जस्टीन कॅन हे नाव तुम्हाला माहीत आहे का?

www.justin.tv हि वेबसाइट जर तुम्हाला माहीत असेल तर मग मात्र तुम्ही जस्टीनबद्दल aware असाल.

दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये हा वाक्यप्रकार अक्षरक्षः खरा कसा करता येतो हे दाखविले या पठ्याने.

फार नाही २००७ साली सुरु झाली ही गोष्ट. जस्टीनच्या सुपिक डोक्यात एकदा एक भन्नाट आयडीया चमकली. मग काय गड्याने घेतला एक व्हिडीओ कॅमेरा टांगला स्वता:च्या डोक्याला (फोटो बघा) आणी विचारता काय सुरवात झाली एका इतिहासाची.

त्या कॅमेराने त्याने आपले खाजगी आयुष्य चव्हाटयावर मांडायला सुरु केले. (केवढी ही हिंम्मत्(की निर्लज्जपना?)…बापरे) आणि तो चव्हाटा देखिल साधासुधा नव्हे तर जागतिक बरं का. त्याने आपल्या आयुष्याचे थेट प्रक्षेपण इंटरनेट्वर दाखवायला लागला. दुसर्‍यांच्या आयुष्यात डोकावण्याच्या लोकांच्या घाणेरड्या सवयीचा त्याने पुरेपुर फायदा उचलला. काही महीन्यातच त्याच्या वेबसाइटवर हजारो लोकांच्या उड्या पडायला लागल्या. जस्टीन आपल्या घरात काय काय करतो इथपासून बाहेर कुठे कुठे फिरतो ह्याची लोक दखल घ्यायला लागले (इथे आम्हाला स्वता:च्या घरातच कोणी विचारत नाही..असो). कित्येक मुली त्याच्याबरोबर फिरण्यासाठी (समजतय का मी काय म्हणतोय ते) एका पायावर तयार होत्या.कारण?

कारण फार सोपे होते थोड्याच दिवसात त्याला मिळालेली प्रसिद्धी. फक्त सहाच महीन्यात तो हिरो झाला. अर्थात यात त्याला त्याच्या मित्रांचीपण साथ लाभली. सहज म्हणून सुरु केलेला उद्योग आता एक मोठा उद्योगधंदा बनला आहे justin.tv च्या रुपाने. जस्टीनने आता आपले थेट प्रक्षेपण बंद केले आहे परंतु त्याची वेबसाइट आता जगभरातल्या लाखो लोकांना आपले स्वतःचे व्हिडीवो होस्ट करायला मदत करते व जवऴजवळ २५० देशात ३० मिलियन लोक हे थेट प्रक्षेपण पहात असतात. आणी त्याचवेळेस जस्टीन्ला आणखी क्षीमंत बनवत असतात.

अशा कितीतरी आयडिया आपल्यालापण सुचत असतात. परंतू  त्या अमलात आणण्यासाठी जे साहस, निर्धार, चिकाटी लागते त्यातच नेमके कुठेतरी कमी पडतो. काय बरोबर बोलतोय की नाही झम्प्या?

आहे का तुमच्यामध्ये कोणी जस्टीन?

काही कलप्ना असतील जरुर कळवा.

प्रतिक्रिया
  1. महेंद्र म्हणतो आहे:

    आयडीया मस्त आहे. वाचलंय या बद्दल पुर्वी एकदा.. छान पोस्ट.

  2. चेतन सुभाष गुगळे म्हणतो आहे:

    सर्व सरकारी नोकरांच्या / राजकारण्यांच्या डोक्यावर असे कॆमेरे बसवा. ते चोवीस तास काय करतात ह्याचे प्रक्षेपण महाजालावर चालु ठेवा. मग बघा भ्रष्टाचार नष्ट होऊन देश कसा पुढे जातो ते….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s