ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का?

Posted: ऑगस्ट 4, 2010 in ब्लॉग आणी ब्लॉगर्स
टॅगस्, , ,

ब्लॉगिंग संदर्भात माझा अभ्यास चालू असताना एका फोरममध्ये एक इंटरेस्टींग प्रश्न माझ्या वाचनात आला. तो म्हणजे ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का?

तसे मी बरेच ब्लॉग्स रोज फॉलो करतो,वाचतो. त्यातील काही तर चक्क १२-१५ वर्षे वयाच्या मुलांचेपण आहेत. तेदेखील मी जेंव्हा त्यातल्या एकाच्या about me या पेजवर गेल्यावर मला समजले तोपर्यंत मला तो ब्लॉग एखाद्या एक्स्पर्टने लिहिलाय असेच वाटायचे. नंतर मी about me  हे पेज नेहमी चेक करायला लागलो हे विशेष.. तर मुद्दा असा की त्या ब्लॉगरचे वय समजल्यावर माझ्या दृष्टीकोनात काही फरक पडला का? तर उत्तर आहे…होयपण आणी नाहीपण.. आहे की नाही गंम्मत…होय यासाठी की मला आश्चर्य वाटले एवढया लहान वयात पण मुले इतके व्यवस्थीत व नियमित लिखाण करू शकतात. हे पचवायला थोडे अवघड गेले….आणी नाही यासाठी की वयाचा व अकलेचा तसा फार काही संबध असतो असेही मला वाटत नाही. (यांसाठी ज्ञानेश्वरांचे उदाहरण पुष्कळ आहे.)

वय समजल्यावर तर त्यां ब्लॉगरबद्दलचा माझा आदर दुणावला. असो पण अशी उदाहरणे फार नाहीत. पण काही ब्लॉग्सबाबतीत वयाचा फरक नक्की पडत असावा असे मला वाटते. आपल्या भारतीय संस्कृतीत वयाला फार महत्व आहे.(त्याच्या खोलात शिरायची इथे गरज नाही.) आपल्याकडे वय जास्त म्हणजे अनुभव जास्त म्हणजे ज्ञान जास्त….असाही एक समज आहे. त्यामुळेही काही फरक पडत असेल?…मित्रांनो तुम्हाला काय  वाटतं याबद्दल? मांडू शकता तुम्ही काही वेगळे मुद्दे?

बाय द् वे….माझे वय काय असेल तुमच्या अंदाजे?:)

Advertisements
प्रतिक्रिया
  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   फक्त ५ ने अंदाज चुकला…महेंद्रजी.

   एनी वे! थांकु वेरी मच..

   झम्प्याच्या दारावरती दिलेत दर्शन तुम्ही….
   समजत नाही आता कसे मानावे आभार आम्ही…
   येत जा असेच अधे मधे….
   वाट पाहिल झम्प्या तुमची…
   व तुमच्या प्रतिक्रियेची…
   तुमच्या मौलिक शब्दांची..

   • महेंद्र म्हणतो आहे:

    मी आज गोव्याला आहे. कामानिमित्य आलोय. त्यामुळे नेट वर नव्हतो पुर्ण दिवस. बाय द वे.. पाच पुढे की मागे?
    माझं मत आहे की लिखाणावर परिणाम होतोच. एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा वयोपरत्वे बदलतो. आजच सकाळवरचा थेऊरचा लेख वाचला आणि मझ्या लक्षात आलं की कदाच्वित याच घटनेकडे मी काही वर्षापुर्वी वेगळ्या नजरेने पाहिले असते. 🙂 असो..
    छान लिहिलाय लेख, उत्स्फुर्त लिखाण असल्याने वाचायला बरे वाटते. लिहित रहा..

   • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

    गोव्यात..अरे वाह!!तेही कामानिमित.. नशीबवान..माझेही खूप स्वप्न आहे गोव्यातच राहायचे व काम करायचे..बघुया..
    बर येवूया आता वयावर..आधीच्या प्रतिक्रियेत मी मुद्दामच पुढे की मागे सांगायचे टाळले..वा आताही टाळतो..रागावू नका..
    मला आवडेल कोणीही झम्प्याकडे कोणत्याही चष्म्यातून न बघता फक्त त्याच्या ब्लॉगच्याच माध्यमातून बघावे..प्लीज रागावू नका..झम्प्याला तुमच्या मार्गदर्शनाची खूपच गरज आहे..
    व जेंव्हा आपण प्रत्यक्षात भेटू (आशा करतो लवकरच) तोपर्यंत हे सस्पेन्सच राहुन्द्या ही विनंती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s