“It all started to earn a side income, and at that stage, I had never imagined this kind of success.”

– Karsanbhai Patel, CMD, Nirma Ltd.


179176image015

गोष्ट तशी फार जुनी नाहीये.  १९६९ सालचीच आहे. करसनभाई पटेल नावाचा एक सामान्य गुजराती माणूस आपल्या  केमिकलच्या ज्ञानाचा उपयोग करून पुढे मोठमोठ्या जागतिक कंपन्यांना आपल्यासमोर हतबल करणार होता…………व शून्यातून जग कसे उभे करायचे याचा एक राजमार्गच भारताला दाखवून देणार होता.

घरची परिस्थिती जेमतेम असताना करसनभाई कामावरून घरी आल्यावर घराच्या घरीच एक डीटर्जट पावडर बनवायचे. त्या डीटर्जटचे नाव त्यांनी आपल्या मुलीच्या नावावरून  (निरुपमावरून) निरमा असे ठेवले. फावल्या वेळात आपल्या सायकलवर दारोदार फिरून ते निरमा पावडर विकायचे…सतत तीन वर्षे नोकरी सांभाळून हा उद्योग त्यांनी चालू ठेवला..व शेवटी एकदाचे नोकरीला रामराम ठोकून त्यांनी संपूर्ण लक्ष निरमाकडे वळविले.   त्यावेळेस भारतीय बाजारपेठेत अवाढव्य विदेशी जागतिक कंपन्यांनाचीच मक्तेदारी होती. त्या कंपन्या डीटर्जट पावडर १३ रुपये किलोने विकायच्या तर करसनभाई स्वत:च्या हाताने बनविलेली निरमा पावडर ३ रुपये किलोने विकायचे.

थोड्याच दिवसात त्यांनी अहमदाबाद येथे एक वर्कशॉप चालू केले. आणी येथूनच सुरु झाली तुम्हा आम्हाला माहित असलेल्या निरमा उद्योग समूहाची यशस्वी वाटचाल…उत्तम दर्जा व वाजवी किमंत या दोन प्रमुख गोष्टीवर त्यांनी महाराष्ट्र व गुजरातची मोठी बाजारपेठ काबीज केली. आणी इथून पुढील फक्त दहा वर्षातच निरमा हा भारतातील सर्वात जास्त डीटर्जट पावडर विकणारा उद्योगसमूह झाला. हे यश एकट्या करसन भाईंचे नव्हते त्यांना साथ होती आणखी हजारो हातांची. निरमा त्यावेळेस घरोघर हाताने बनविली जाईची. ज्यामुळे उत्पादनखर्चात खूप बचतपण व्हायची व लोकांना रोजगारपण मिळायचा. १४००० लोकांना रोजगार मिळवून देणारा भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह असाही निरमाचा एक नावलौकिक झाला.

१९९५ मध्ये करसनभाईनी अहमदाबादेत निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजी सुरु केली… ..एक एक करीत त्यांनी आपल्या शिरपेचात असे अनेक तुरे रोवले….त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीची दखल घेवून १९९० मध्ये भारत सरकारने त्यांना उद्योगरत्न हा पुरस्कार देवून गौरविले. तर २०१० मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देवून गौरविले.

ही गोष्ट जरी करसनभाईंची असली तरी ती फक्त त्यांच्या एकट्याची किंवा एकटयापुरती मर्यादितपण नाहीये,

ही गोष्ट आहे असंख्य भारतीय जीद्दींची..निर्धारांची..मेहनतीची..स्वप्नांची…आपणही एका वेळेस एकाच नव्हे तर अनेक जागतिक  कंपन्यांना तोंड देवून त्यांच्या तोडीस तोड एक जागतिक कंपनी बनवू शकतो असा आत्मविश्वास असणाऱ्या हजारो भारतीयांची….

करसनभाई पटेल व निरमा ह्यांच्याबद्दल अजून बरेच काही लिहिण्यासारखे आहे व लिहिताही येईल. पण तुम्हाला थोडक्यात अंदाज यावा म्हणून मुद्दामच कमीत कमी शब्दात मुख्य मुद्दा मांडण्याचा झम्प्याने येथे प्रयत्न केला आहे. तरीही अजून माहिती कोणास हवी असल्यास येथे किंवा येथे क्लिक करावे.

प्रतिक्रिया
 1. mahayoddha म्हणतो आहे:

  झंपेश्वर… हा लेख भन्नाट आहे… तु अशीच माहिती टाकत राहिलास तर तुझा ब्लॉग एक छानसा एनसाक्लोपिडिआ होईल नक्किच. कोण जाणो हा ब्लॉग वाचूनच एखादा उद्योजग घडायचा. 🙂

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   एनसाक्लोपिडिआ…अरे कल्पना छान आहे..पण ते माझ्या एकट्याचे काम नाहीये रे…त्यासाठी खूप हात पाहिजेत मदतीला…सध्या तरी माझे दोनच हात राबताहेत रे इथे…
   भविष्यात बघू….
   कल्पना सुचविल्याबद्दल मात्र खूप खूप धन्यवाद!!!

 2. महेंद्र म्हणतो आहे:

  निरमा चं चक्क विद्यापीठ पण आहे अहमदाबादला. खूप मोठी इन्स्टीट्य़ुट आहे अगदी आय आय टी च्या सारखा परीसर आहे त्याचा.

 3. Sonali म्हणतो आहे:

  Hi,
  We have shortlisted this article for Netbhet eMagazine Nov 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.
  Please provide your full name and email id.
  Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary – 09819128167 for more information.

  Regards,
  Sonali Thorat

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s