आयुष्यात कधीही, काहीही अर्धवट सोडू नका…..

Posted: ऑगस्ट 11, 2010 in शिकलेच पाहिजे असे काही!
टॅगस्, , , , , , , ,

चिकाटी काय असते?

प्रेरणा कशापासून मिळते?

अपयशाला कसे सामोरे जायचे?

अडचणीवर वा संकटांवर मात कशी करायची?

फक्त एखादी स्पर्धा जिंकणे व लाखो लोकांचे हृदय जिंकणे…यात किती फरक असू शकतो?

जिंकण्याइतकेच स्पर्धा पूर्ण करणे हेही किती महत्वाचे असते?

प्रेमात किती ताकद असते?

बाप व लेकाचे नाते काय असते?

आणी उर भरून कसा येतो?

ह्या सर्व प्रश्नांची फक्त उत्तरेच नाहीत तर हे सर्व जर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर खाली दिलेला  फक्त ५ मिनिटांचा व्हिडिओ बघा.

आवडला तर प्रतिक्रिया द्या.

प्रतिक्रिया यासाठी द्या की…इतके भरून आल्यानंतर स्वत:ला व्यक्त करणे किती अवघड होते हे समजण्यासाठी…

Share on Facebook

Share

Yahoo Buzz Yahoo Buzz

Google Buzz Google Buzz

Add this anywhere Add this anywhere

Advertisements
प्रतिक्रिया
 1. Asmita Pawar Mendhe म्हणतो आहे:

  शब्दातीत आहे….
  खरे सान्गते मी सद्ध्या एका मोठ्या सन्कटातुन जात आहे.
  आणी अर्ध्यातुनच जाणार होते व तशी पावले पण उचलली होती
  पण
  मी अजुन एक चान्स घ्यायचा ठरवला आहे.
  बघु नशीब अजुन किती परिक्शा घेते ते…
  असो..
  खुप सुन्दर व्हिडीओ आहे….

  • Shaile म्हणतो आहे:

   Its great video and very much inspiring too,
   this video i have stored whenever i am down i do watch this video which gives me strength once thanks for those who has given to us
   God bless to you as ur not only inspiring to u as well to community u are living.
   So i request give something back to society in which your are living and so to ur country too.

 2. झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

  अस्मिताजी एक गोष्ट खूप मनापासून व अनुभवातून सांगतो की कितीही मोठे संकट असू द्या…मार्ग निघतो..अजिबात डगमगू नका..तसा विचारही मनात आणू नका…विचारामध्ये खूप मोठी शक्ती असते..त्यामुळे चुकीचे विचार चुकुनही मनात आणू नका..जसे विचार कराल तशा घटना घडतात..त्यामुळे विचारांवर पूर्ण नियंत्रण ठेवा..हे खूप अवघड आहे हे मी जाणतो आणी खास करून अशा संकटाच्या वेळीच..पण तरीही धीर सोडू नका…संकट कितीही मोठे असले तरी ते कायमचे नसते…उलट संकटाचा उपयोग करून घ्या. ते जर आलेच आहे तर जसे ते खूप काही घेतल्याशीवाय जाणार नाही तसेच ते खूप काही दिल्याशिवायही राहणार नाही..फक्त ते घेण्यासाठी तुम्ही तितक्याच सक्षम रहा. अशा संकटांमुळेच आयुष्याला काही अर्थ आहे…हे मी काही तुम्हाला सांगायला नको..

  चान्स एक नाही तर अनेक द्या….आयुष्याला कमी लेखू नका..परिक्षानी डगमगू नका..काही कालावधीनंतर हेच संकट तुम्हाला खूप छोटे वाटेल..माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे तसेच खूप अवघडही आहे….

  चांगल्या गोष्टीत स्वत:ला गुंतवून ठेवा. व मन अजिबात रिकामे ठेवू नका..अशा वेळेस रिकामे मन सर्वात मोठा अडथळा होते. व सर्वात मोठ्या शत्रूची भूमिका निभावते..मनाचे तेच काम आहे.सावध रहा..

  सर्वात शेवटी पुन्हा एकदा वर दिलेले वाक्य सांगतो…आयुश्यात कधीही काहीही अर्धवट सोडू नका…नाहीतर पुन्हा कोणतीच गोष्ट तडीस न्यायची उमेद हरवून बसाल.

 3. मुक्त कलंदर म्हणतो आहे:

  झम्पूराव नि:शब्द झालो..

 4. झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

  thanks Shaile…i love to inspire and motivate others. in my opinion every human-being needs inspiration. if anyone supports u or motivates u, you can do miracles in this short n beautiful life.

  • Sameer Naik म्हणतो आहे:

   नमस्‍कार ! मी पहिल्यांदाच तुमच्या ब्लॉगला भेट दिली आहे. काही पोस्टस वाचल्या , उदा.थेऊर ते हिंदू……..माझा ब्लॉग प्रवास , नागपंचमी , आयुष्यात कधीही, काहीही अर्धवट सोडू नका…..
   सर्वच छान आहेत .never ever give up चा video पाहीला ………….काय सांगु ? पाणी आलं डोळ्यात , सुन्न झालो ! Shaile यांना दिलेले उत्‍तरही आवडले , कारण ते खरे आहे .प्रेरणा जगण्यासाठी , यशासाठी मूलभूत गरज आहे ;त्यामूळे इतरांना प्रेरित करणे खरोखर मोठी गोष्ट आहे. THANKS A LOT ! ” आयुष्यात कधीही, काहीही अर्धवट सोडू नका “ही गोष्ट मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. I am from Nashik doing L.L.B. 4th Yr. Blogging is a new thing for me ! I also just started a Blog, please visit it. Ur suggessions,opinion,comments are welcome!
   Its – sameerpnaik.blogspot.com लोभ असावा,
   -समीर पु. नाईक

 5. झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

  खूप खूप धन्यवाद आणि स्वागत समीर.एवढी व्यवस्थित प्रतिक्रिया दिलीत म्हणजे तुम्हाला मी आतापर्यंत केलेले थोडेफार काम आवडलेले दिसते. मलाही अशाच प्रोत्साहनाची खूप गरज आहे. एक विनंती मला अहोजाहो करू नका. मी खूप सामान्य आहे हो, हेच व्यक्त करण्यासाठीच मी झम्प्या हे टोपणनाव नाव घेतले आहे.
  असो..तुमच्याही ब्लॉग जीवनाला माझ्या तर्फे भरपूर शुभेच्छा.
  एकच संदेश…
  भरपूर जगा, भरपूर वाचा आणि भरपूर लिहा.

 6. Sameer Naik म्हणतो आहे:

  धन्यवाद झंप्या! कृपया मलाही अहोजाहो करू नये,समीर म्हंटलेले आवडेल.
  प्रत्येक कृतीला प्रतिसादाची अपेक्षा असते , प्रतिसाद मिळाल्यामुळे आपण नक्की कुठे आहोत याचे भान येते , काही वेळा योग्य कृतीचे समाधान मिळते , प्रोत्साहन मिळते तर काही वेळा आपल्या पात्रतेचे जाणीव होते ! तुझ्या “थेऊर ते हिंदू……..माझा ब्लॉग प्रवास” या लेखात तू म्हंटले आहेस की,{ कॉपी-पेस्टबद्‍दल क्षमस्व }
  “आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने खटकली ती म्हणजे बऱ्याच चांगल्या ब्लॉगवर बरेच चांगले लिखाण असताना तिथे कोणीही प्रतिक्रिया देत नाही..ठराविक लोकप्रिय ब्लॉग्सवर प्रतिक्रिया दिल्या जातात..(ज्या दिल्या जाव्यातच) याची कारणे अनंत असतील…इतका वेळ आहे कोणाकडे? पासून ते असे काही ब्लॉग्स आहेत हे ही माहीत नसन्यापर्यंत….अनेक…..पण मला असे वाटते की यावर आपल्यासारख्या प्रत्येकाने काहीतरी केले पाहिजे म्हणजे जेणेकरून इतरांना काही चांगले वाचावयास मिळेल व त्या ब्लॉगरलाही थोडा हुरूप येईल”.
  माझा चांगला की वाईट ते मला माहीत नाही , कोणाच्या प्रतिक्रियेची अपेक्षा नाही , परंतु योग्य प्रतिक्रिया मिळाल्या तर मी नक्की किती पाण्यात आहे ते मला कळेल.

  माझ्या ब्लॉगला भेट देण्याची कृपा करावी ! मी माझा ब्लॉग शक्यतो २ ते ३ दिवसांनी अपडेट करण्याचा करतोय , तुझा निरंतर प्रतिसाद मिळावा , जे विशेष आवडले ते सांग, जे आवडले नाही ते ही जरूर सांग ! तुला तुझ्या सर्व कार्यासाठी शुभेच्छा !
  मी जरा जास्तच लिहीले आहे, ते कायद्‍याचा विद्‍यार्थी असल्यामुळे आम्हाला आपले म्हणणे सविस्तर मांडण्याची सवयच लागली आहे.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  लोभ असावा
  – समीर पु. नाईक

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   हाय समीर..तुझ्या ब्लॉगला भेट दिली..सर्व कविता वाचल्या, आवडल्याही
   कविता वाचून कुठेही जाणवले नाही की तू कायद्याचा विद्यार्थी आहेस..कारण तुझ्या कविता अजिबात किचकट नाहीत.
   फक्त एकच विचारावेसे वाटते तू जर प्रतिक्रिया इतक्या व्यवस्थीत लिहू शकतोस तर तुझ्या ब्लॉगवर एकही लेख का नाही?
   तुझे विचार बऱ्यापैकी स्पष्ट जाणवतात मग ते लिहून ब्लॉगवर का मांडत नाहीस?

   • Sameer Naik म्हणतो आहे:

    हाय ! झंप्या ! thank U very much for visiting my blog! खरं सांगायचं तर हा माझा पहीलाच प्रयत्‍न ! तू दिलेली प्रतिक्रिया योग्य जागी आहे, आवडली !
    या अगोदर ब्लॉग बद्‍दल फक्‍त वाचले होते , ब्लॉग मात्र एकही नाही . अमिताभ बच्चन , आमिर खान अशांच्या ब्लॉग विषयी ऐकले होते, एक दिवस थेट ब्लॉगच सुरू केला.मोजून १५ दिवस झालेत. सुरूवातीला आणि आतापर्यंत डोक्यात हेच होतं की आपल्या कविता इथे टाकायच्या . आता तू म्हणतो आहेस की लेखही दे , चलो ये भी ट्राय करके देखेंगे ! मी जरूर लेख लिहीन आणि पहीला लेख तूलाच अर्पण करेन.

    ………………………………………………………..आणि एक किंतु आलाय रे मनात , मी तुला माझ्या ब्लॉगला भेट दे, प्रतिक्रिया दे असं एक प्रकारे फोर्स केलं की काय???????????????????????????
    लोभ असावा
    – समीर पु.नाईक

   • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

    अरे समीर मला काही अर्पण करण्याइतका थोर बनवू नकोस मला…अकाली मरेन रे मी. कारण थोर लोकांची जागा थडग्यात असते. आपल्यासारख्या सामान्यांचे शिव्या हेच खाद्य वं त्यावरच आपली प्रगती होते.

    आणि राहिला प्रकार फोर्स करण्याचा तर तो तू अजिबात केला नाहीस…उलट मी तर तुला सल्ला देईन…फोर्स तू करावास…अगदी पूर्ण जोमाने करावास..अजिबात न लाजत न घाबरता..आपल्याच प्रोडक्टची प्रसिद्धी करावयास आपणच कशाला घाबरायचे. मग कोण येणर आपल्याकडे न बोलावता. हा फक्त एका गोष्टीची काळजी घे आलेला प्रत्येकजण तुझ्याकडून काहीतरी घेऊनच परत गेला पाहिजे तेसुद्धा परत परत येण्यासाठी…एकदा का हे तुला जमले की बास् मग बाकीचे त्यांच्यावरच सोपव…..सदिच्छा!!! 🙂

 7. Sameer Naik म्हणतो आहे:

  Yes Sir ! I remember one saying of famous Writer Richard Bach!
  ”You are never given a wish without being given the power to make it true, however you may have to work for it” !
  तुझे आभार मी आता मानणार नाही , त्यापेक्षा तुझ्या ऋणात राहायला आवडेल मला !
  लोभ असावा
  समीर पु.नाईक

 8. रविंद्र कोरे म्हणतो आहे:

  राम राम झंप्या,
  मी पाहिलेल्या सर्वात उत्कृष्ट चल्चीत्रापैकी एक.

  आपल्या लेखांचा नवीन वाचक,
  रविंद्र कोरे.

 9. Ajay म्हणतो आहे:

  kay ra zampya kahi navin nahi ka?????????????????

  jhapatne visarla ka

  jhap jhap jhapat ki ra

  lokanna lavakar……………….

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   अरे अजय..जरा दुसऱ्या एका नवीन ब्लॉगमध्ये जास्तच व्यस्त झालोय म्हणून येथे थोडे दुर्लक्ष झालंय हे खरं. पण काळजी नको….थोड्याच दिवसात हजर होतो झपाटलेल्या नवीन लेखांसह तुम्हाला झपाटायला 🙂

 10. TUSHAR JAGTAP म्हणतो आहे:

  KARCH MANAPASUN SALAM
  नोंदवा Cancel reply

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s