आपली प्रतिज्ञा आणि…..माझाही खो

Posted: ऑगस्ट 15, 2010 in झम्प्या झपाटलेला
टॅगस्, , , , , , , ,

काल इंटरनेटवरचा बराचसा वेळ बऱ्याचजणांचे खो वाचण्यात गेला. टाईमपाससाठी छान कल्पना आहे…काल महेंद्रकाकाकडून श्रीकृष्ण सामंतानी स्वत:हून खो घेतला. हे त्यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षीचे इनिशेटीव व उत्साह पाहून मीही प्रेरित झालो व आता त्याच्याकडून स्वत:च खो घेऊन आता ही खोखोगीरी खेळत आहे.

आज १५ ऑगस्ट भारताचा ६३ वा स्वातंत्र्य दिन..त्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आपल्या सर्वांना आहेतच. आजचा दिवस तसा आनंदाचा दिवस. स्वातंत्र्यदिन हा देखील एक सणच आहे..व सणाच्या दिवशी हसून, खेळून, बागडून, आनंदी राहायचे असते. त्यासाठीच आज कोणतेही गंभीर लिखाण न करता व उपदेशाचे डोस न पाजता मी आपल्या देशाच्या प्रतिज्ञेला (आहे का लक्षात असा काही प्रकार असतो ते?) समोर ठेऊन काही पकाऊ कविता/विडंबने केली आहेत. तरी तुमच्याकडे फुकट घालवायला थोडा वेळ असल्यास तुम्ही ती सहन करावीत. ती तुम्हाला नक्कीच आवडणार नाहीत. आणि जर न आवडण्याच्याही वर तुम्हाला त्रास झाला तर खाली असलेल्या बऱ्याचश्या मोकळ्या जागेत तुम्ही तुमच्या शिव्यांचा पाऊस मनसोक्तपणे पाडू शकता.

आधी मी आपली म्हणजे भारत  देशाची ओरिजनल प्रतिज्ञा देतो…( इथे बरेचजण सोयीस्कररीत्या विसरले असतील म्हणून ) व त्याखाली माझी विडंबने सादर करतो…

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधारया माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

विडंबन पहिले

इंटरनेट माझा देश आहे।
सारे इंटरनेटवासीय माझे बांधव आहेत।
माझ्या इंटरनेटदेशावर माझे प्रेम आहे।
माझ्या इंटरनेटातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या वेबसाईट्सचा मला अभिमान आहे।
त्या वेबसाईट्सचा मेंबर होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या फेसबुक, ऑर्कुट
आणि ट्विटर फॉलोअर्सचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझे इंटरनेट आणि इंटरनेटवासीय
यांच्याशी कनेक्टेड राहण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे फॅन्स आणि स्क्रॅप्स
यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

।।झम्प्या झपाटलेला।।

वैधानिक इशारा:  खालील भाग वाचताना मळमळणे,  गुदमरणे, चीडचीड,मनस्ताप होणे यांसारख्या भावना उद्द्पीत होऊ शकतात. तरी होणाऱ्या त्रासास झम्प्या जबाबदार असणार नाही.

विडंबन दुसरे

फेसबुक, ऑर्कुट व ट्विटर असे अनेक माझे देश आहेत.।
येथील सारे नागरिक माझे सो कॉल्ड मित्रमैत्रिणी आहेत.।
माझे माझ्या देशांवर नको इतके प्रेम आहे.।
माझ्या देशातल्या वेळखाऊ, पकाऊ
आणि नालायक परंपरांचा मला अभिमान आहे.।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी दिवस रात्र झटत राहीन.।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवो न ठेवो
येथील प्रत्येकाची मान नक्की कापीन.।
वेळ आल्यास प्रत्येकाची पाठही खाजवून देईन.।
माझे देश आणी माझे देशमित्रमैत्रिणी
यांच्याशी सदा नि कदा खोटे बोलण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.।
माझे  कल्याण आणि
माझी समृद्धी ह्यांतच त्यांचे
सौख्य सामावले आहे।

।।झम्प्या झपाटलेला।।

विडंबन तिसरे

करित होतो आणि येऊ घतलेल्या संकटाची एकदम जाणीव झाल्यामुळे थबकलो व थांबलो

त्यामुळे पुढील विडंबने पुन्हा केंव्हातरी…

प्रतिक्रिया
 1. avya agaau म्हणतो आहे:

  आज १५ ऑगस्ट भारताचा १६३ वा स्वातंत्र्य दिन.. !!!!!!!!!!!!!????
  i thot its 63rd iday….

 2. रोहन म्हणतो आहे:

  आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे धिंडवडे काढलेले वाचून मी पुढे वाचूच शकलो नाही. हा प्रकार तुला पटणारा आहे का? अशा प्रकारच्या राष्ट्रीय प्रतिकाची बदनामी करणाऱ्या कृतीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते ही शक्यता तुला लक्षात आली नाही का?

  प्रतिज्ञा लिहायचीच होती तर स्वतःची प्रतिभा वापरून तयार करणे आवश्यक होते.. त्यासाठी ‘भारताची प्रतिज्ञा’ मोडून तिचा अपमान करण्याची आवश्यकता नव्हती… आपला हेतू तसा नसेल पण ते तसे घडले आहे हे नक्की.. किमान माझ्या दृष्टीने…

  आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे धिंडवडे काढण्यात आपला सहभाग राहू नये, असे आवाहन करण्यासाठी मी सर्वांना उद्देशून ही प्रतिक्रिया लिहिली आहे. त्याने होणारी राष्ट्रीय प्रतिज्ञेची बदनामी टाळण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन मी सर्वांना करतो.

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   रोहन तुझ्या भावना मी समजू शकतो.पण तूच म्हणल्याप्रमाणे माझा हेतू कोणालाही दुखावण्याचा वा कोणाचाही अपमान करण्याचा नाही.

   फक्त एकच गोष्ट सांगतो भारताच्या प्रतिज्ञेचे धिंडवडे काढण्याची माझीच काय पण कोणाचीही हिम्मत होणार नाही.

   इथे मी केलेले विडंबन हे फक्त आपल्या प्रतिज्ञेचा फॉर्म वापरून केलेले आहे. मी आपल्या देशाबद्दल वा आपल्या देशबांधावाबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही व अपमानही केला नाही. मी जे काही लिहिले आहे ते माझ्या इंटरनेट वापराबद्दल, फेसबुक, ऑर्कुट वगैरे बद्दल लिहिले आहे.

   माझ्या या लिखाणामुळे आपल्या प्रतिज्ञेची अजिबात बदनामी होत नाही. असे मला तरी वाटते.

   हा पण प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. जर तुला असे वाटले असेल की मी चुकलो तर
   मला माफ कर.

   आणखीन एक तुला सांगावेसे वाटते. असेच आवाहन तू फेसबुक वरील आवरा या कम्युनिटीवरपण करू शकतोस. कारण त्यांनी पण आज अशीच एक प्रतिज्ञा सादर केली आहे.
   माझे वाचक अजून दोन आकड्यात पण नाहीत..त्यांचे तर लाखोने आहेत. बघ तेथे काही करता आले तर…

   • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

    जर कोणाचे फेसबुकवर खाते नसेल व त्यांना आवरा या कम्युनिटीवर काय पोस्ट आहे हे जाणून घ्याचे असेल तर ती पोस्ट मी खाली देत आहे.
    **********************************************
    आवरा माझी community आहे.सारे आवराकर माझे बांधव(?)आहेत.माझ्या
    commuवर माझे प्रेम आहे.माझ्या commuवरील समृद्ध आणि विविधतेने
    नटलेल्या फालतूपणाचा मला अभिमान आहे.त्या फालतूपणाचा पाईक होण्याची
    पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.माझ्या communशी निष्ठा राखणे यातच माझे सौख्य सामावले आहे.

    …”१ लाख”
    ***************************************************

 3. Nachiket म्हणतो आहे:

  Come on..humour should be taken as humour..

  प्रतिज्ञेच्या फॉरमॅट मध्ये कोणी काही विडंबन केलं तर प्रतिज्ञेचा अपमान कसा होईल..? ती आपल्या जागी घट्ट आहे.

  पु.ल. नी बटाट्याच्या चाळीतल्या संगीतिकेमध्ये म्हटलंय:

  मना सज्जना ट्रामपंथेची जावे |

  तरी वाचतो एक आणा स्वभावे ||

  आता एकेक आणा वाचवण्याच्या क्षुद्र वृत्तीच्या माणसाने मनाच्या श्लोकांचा आणि पर्यायाने रामदास स्वामींचा घोर अपमान केला आहे का?

  विनोदाचे स्पिरीट कशाला मारायचे.

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   yes exactly well said Nachiket sir..
   तुम्ही दिलेल्या उदाहरणासारखी भरपूर उदाहरणे आहेत…एक मीही देतो इथे.

   हरिनाम जपाच्या काही अवर्तानांनंतर येते, ती “तल्लीनता”
   आणि सोमरसाच्या काही अवर्तानांनंतर येते, ती “टल्लीनता” !! 🙂

   आता यात कुठेही हरिनामाचा अपमान करण्याचा हेतू नाहीये…पण जर काहींना अतिशयोक्ती करायचीच असेल तर…..

 4. Ajay म्हणतो आहे:

  are kay re kiti …………l

  are deva kay he

  Zop udhali

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s