तुमच्या वर्डप्रेस ब्लॉगवरील लेख कोणत्याही सोशल साईट वा सर्विस बरोबर क्षणार्धात जोडा.

Posted: ऑगस्ट 21, 2010 in ब्लॉग आणी ब्लॉगर्स
टॅगस्, , , , , , , , , , , , , , , ,

मित्रांनो आज मला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया खरे तर सूचना अशी होती की ह्या ब्लॉगवरील माझी एक पोस्ट एका वाचक मित्राला खूप आवडली. ती त्याला इतरांबरोबर शेअरही  करायची होती पण ती शेअर करण्यासाठी त्याला हवे तसे ऑप्शन तिथे नव्हते.  त्या वाचक मित्राचा ब्लॉग गुगलच्या ब्लॉगरवर असल्याने त्याला तिथे त्याचे लेख शेअर करण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. पण वर्डप्रेस.कॉम असे ऑप्शन्स आपल्याला देत नाही. वर्डप्रेस.कॉम  सुरक्षिततेच्या कारणास्तव आपल्या ब्लॉगवर जावा स्क्रिप्ट रन करायला परवानगी देत नाही. आणि त्यामुळेच आपल्याला आपला लेख इतरांपर्यंत पोहोचवण्यास वा शेअर करण्यास थोड्या अडचणी येतात. हां हल्लीच काही दिवसांपूर्वी वर्डप्रेसने ट्विटरची सोय आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. परंतू  ट्विटरपेक्षा आपल्याकडे फेसबुक, गुगल बझ, याहू बझ, ऑर्कुट हे जास्त लोकप्रिय आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी वर्डप्रेसने ह्यापैकी कोणालाही आपला दरवाजा उघडलेला नाही. पण त्यांनी नाही उघडला म्हणून आपण काय हातावर हात ठेऊन गप्प बसायचे…..नाही नं….म्हणूनच आज ठरविले…आपली पोस्ट जर एखाद्याला आवडली तर त्याला ती तिथल्या तिथे कोणाहीबरोबर, कोणत्याही सोशल साईटवर, कोणत्याही ठिकाणी ताबडतोब शेअर करता आली पाहिजे.

बऱ्यापैकी गुगलिंग केल्यावर मला अनेक उपाय सापडले. त्यातले काही खूप किचकट होते तर काही खूप सोपे पण त्रासदायकही होते. बरेचशे मी ट्रायही केले. शेवटी एक पद्धत मला खूप सोपी आणि सोयीस्कर वाटली ती मी इथे तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. जर तुम्हाला ही सोडून इतर कोणतीही वेगळी पद्धत माहीत असेल तर तुम्हीही ती मला सुचवू शकता.

सध्या मी फेसबुक शेअर, फेसबुक लाईक, गुगल बझ वं याहू बझ यांच्या आयकॉन्सचे एचटीएमएल कोड  इथे देत आहे. ते तुम्ही तुमची नवीन पोस्ट लिहून झाल्यावर त्याच्या खाली फक्त कॉपी पेस्ट करायचे. जुन्या पोस्टवरतीही तुम्ही हे अपडेट करू शकता. मी केले आहेत. तुम्ही ते इथे वं इथे बघू शकता.

ते कॉपी पेस्ट करताना तुम्हाला फक्त एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे तुम्हाला तुमच्या वर्डप्रेसच्या टेक्स्ट एडिटर मधील एचटीएमएल व्ह्यू मध्ये जाऊन हे कोड्स पेस्ट करावे लागतील. घाबरू नका. खूप सोपे आहे. फक्त एडिटरमधील एचटीएमएल व्ह्यूमध्ये जा. कंट्रोल एन्डने सर्वात खाली जा व इथे खाली दिलेले एचटीएमएल कोड्स तिथे पेस्ट करा. बस इतकेच. आता तुमच्या पोस्टची प्रिव्ह्यू पहा. तिथे तुम्हाला सगळ्या लिंक्सचे आयकॉन्स दिसतील. झाले तर मग आता तुम्हीही ब्लॉगरप्रमाणे एका क्षणात तुमची पोस्ट इतरत्र बझ किंवा शेअर करा.

प्रत्येक कोडच्या वर मी तुम्हाला समजण्यासाठी त्या त्या सोशल सर्विसचे नाव देत आहे. तुम्हाला हवी ती सर्विस तुम्ही सिलेक्ट करू शकता.

कॉपी पेस्ट करताना मात्र खालील फक्त एचटीएमएल कोड कॉपी वं पेस्ट करा. वरील नाव नको…नाहीतर एरर दाखवेल.

मित्रांनो खालील पाचही कोड्स तुम्ही एकाखाली एक असेही वा तुम्हाला हव्या त्या क्रमाने कॉपी पेस्ट करू शकता.

Share on Facebook फेसबुक शेअर.

Like this at Facebook! फेसबुक लाईक.

Google Buzz गुगल बझ.

Yahoo Buzz याहू बझ.

Add this anywhere ऑर्कुट वा इतर कोणतीही सर्विस .

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere

Advertisements
प्रतिक्रिया
1. ngadre म्हणतो आहे:

Uttam ani atyant upayogi.

Ata ajun ek nehmi upatnara prashn. Naveen post publish keli kee tee pahile 2 divas marathiblogs.net chya krupene vaachli jaate.nantar Marathiblogs.net var post maage padat jaate aani tyamule naveen vaachakanna hee post disat naahee ani tee history t jama hote.

Tevha nav naveen readers na post baraach kaal satat available hot rahil yaacha upaay kaay?

• महेंद्र म्हणतो आहे:

खूप छान माहिती आहे. याहू वर पण बझ आहे हे आज समजले.
बरेच दिवसापासून नेट वर नव्हतो ( म्हणजे टीपी साठी) आज सगळे पोस्ट्स वाचायला घेतोय नेहेमीच्या ब्लॉग वरचे.

• झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

काका…वेळात वेळ काढून आज तुम्ही इथे भेट द्यायला आलात…खरच खूप मनापासून धन्यवाद. खूप बरे वाटले.
आपल्या ब्लॉग विश्वात दखल होईपर्यंत मीही गुगल बझ बद्दल फक्त एकून होतो. पण इथे आल्यावर वं ते जॉईन केल्यावर त्याची उपयुक्तता समजली.

• झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

नचीकेतजी सर्वप्रथम…प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद….
तुम्हाला नेहमी उपटणारा प्रश्न ही खरेच एक खूप मोठी अडचण आहे…मी सध्या त्याच्याही विचारात आहे, प्रयत्न चालू आहेत काहीतरी मार्ग शोधण्याचा…बघूया सापडेलच काहीतरी.

माझा ब्लॉग अजूनही marathiblogs.net वर नोंदणी झालेला नाही. मी तेथे ब्लॉग नोंदणी करून ३ आठवडे झालेत…काही प्रतिसाद नाही.

2. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

बझवर वर्डप्रेस ब्लॉग डिरेक्टलीसुद्धा कनेक्ट होतो. बझला ब्लॉगची आरेसेस लिंक दिली की झालं. तशीच सुविधा याहूवरही आहे. माझा ब्लॉग तिथेही कनेक्टेड आहे. मी याहू फारसं वापरत नसल्याने वाचकही नाहीत. 🙂
तेव्हा वाचकांनी फक्त बझ परत शेअर केला की झालं!

• झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

आल्हाद प्रतिक्रियेसाठी धन्यवाद…
मी माझा वर्डप्रेस ब्लॉग गुगल बझशी तसाच कनेक्ट केलेला.
पण येथे दुसऱ्या कोणाला फक्त आपला आवडलेला लेखच आपल्याच ब्लॉगवरून थेट जर बझ वा फेसबुक वर शेअर करायचा असेल तर…तर कदाचीत हा एक सोपा मार्ग असेल.
इतरही काही मार्ग तुला माहित असतील तर प्लीज शेअर कर….माझ्यासह बऱ्याच जणांना त्याची फारशी माहिती नाही अजून…
पुन्हा एकदा तुझे आभार!!!

3. nayanraut म्हणतो आहे:

सोप्या भाषेत समजून सांगितले आहेत तू झंप्या, पण तरीही माझ्या डोक्यात जात नाही. हे तांत्रिक काम मला जमतच नाही आजकाल. मी कधीही लेख लिहिला कि फेसबुक व ट्विटर वर कॉपी पेस्ट करतो बस ….

पण तुझी साईट तू छानच बनविली आहेस, कधी वेळ मिळाला तर मलाही अशी साईट बनवायला आवडेल.

धन्यवाद,
नयन

• झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

अरे खूप सोपे आहे…पोस्ट लिहून झाली की हे कोड फक्त खाली पेस्ट करायचे. फिनिश. जोब एन्ड.
ब्लॉग आवडल्याबद्दल खूप धन्यवाद…
खरचं बराच वेळ द्यावा लागतो साईट व्यवस्थीत डिझाईन करायला. 🙂

4. अनिकेत म्हणतो आहे:

मस्त रे झंम्प्या, वर्डप्रेस छान आहे, पण जावास्क्रिप्टला सपोर्ट नसल्याने अनेक अडचणी येतात. कसले सेक्युरीटी कन्सर्न्स आहेत त्यांना देव जाणे, बहुतेक सर्व सपोर्ट करतात, ह्यांचीच काय नाटकं आहेत देव जाणे.

असो, हे मी नक्की वापरणार.. धन्यवाद

• झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

thanks अनिकेत!!! तुझ्याही कथा आता कोणालाही फेसबुकवर थेट शेअर किंवा लाईक करता येतील…म्हणजे फेसबुकचा इतर ओडीअन्सही आपल्या ब्लॉगवर धडकू शकेल…फक्त येथील आपले ब्लॉगर मित्र सोडून आणखीन नवीन वाचकही मिळतील. मित्र तयार होतील… 🙂
वर्डप्रेसवाले अशी सर्विस त्यांच्या फ्री साईटला देत नसतील कारण त्यामुळेच लोक त्यांच्या पेड वर्जनकडे वळतील(वर्डप्रेस.ऑर्ग वर भयंकर सोयी सुविधा आहेत.)…असो हा झाला एक मुद्दा..असे अनेक आहेत..पाहू पुन्हा केंव्हातरी..

5. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

झम्प्या, खुप चांगली माहिती दिलीस…
ह्या तांत्रीक गोष्टींच्या डिटेलात जाण मी नेहमी टाळतो पण तु सोप्या श्ब्दात उलगडलयस सगळ….
धन्स रे..

6. mahayoddha म्हणतो आहे:

झंप्या… हा किचकट प्रकार आहे. another thing, you always have to take care that the code is sharing only that particular post where the icons appear, eg. when I click on share button on post “एक विचार करण्यासारखी गोष्ट”, it actually shares “प्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा”…

Try following links, hope they will help you:
http://en.support.wordpress.com/addthis/
http://wordpress.org/extend/plugins/add-to-any/
http://secure.sharethis.com/publishers/get-sharing-button?type=wordpress

– Saurabh

• झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

अरे THANKS सौरभ…पहिली बघतो ट्राय करून…दुसरी आणि तिसरी लींक मी चेक केलेली आहे. दुसरी जी आहे. ती WORDPRESS.ORG साठी आहे. त्यामुळे आपल्याला काही फायदा नाही. तिसरी जी आहे…ती मी कुठल्यातरी पोस्ट वर वापरली आहे.

एनीवे अशीच आणखीन वेगळी काही माहिती असेल तर तीही प्लीज शेअर कर…..again thanks

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s