मित्रांनो उद्या नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन असे आपले दोन लाडके सण जे एकाच दिवशी येतात. म्हणूनच उद्या एकदम दोन्हीची माहिती देण्यापेक्षा मी विचार केला आज नारळी पौर्णिमेची तर उद्या रक्षाबंधनाची माहिती देऊया. तशी मला आपल्याकडे खास स्त्रियांचा म्हणून जो सण आहे मंगळागौर त्याचीही माहिती द्यायची आहे. बघूया आज जर वेळ मिळालाच तर नाहीतर पुढील मंगळवारी नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

नारळीपोर्णिमा


आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कृतज्ञता वं सहिष्णुतेवर आधारलेला आहे. आपण आपली कृतज्ञतापण सणांच्यामार्फत वाजत गाजत साजरी करतो.आपल्या पूर्वजांनी फार कल्पकतेने सणांची रचना केली आहे.

ज्याच्यामुळे श्रावणात धरती हिरवाईने नटलेली असते. चहूकडे चैतन्याचे झरे वाहत असतात.त्या वरुणाला म्हणजेच जलदेवतेला ते कसे विसरतील? त्याच जलदेवतेप्रती आदरपूर्वक, प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळीपौर्णिमा.

शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. जरी श्रीफळ सागराला अर्पण करावयाचे असले तरी हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे. कोळी समाजाचा आणि सागराचा संबध अतूट असल्याने ते नारळी पौर्णिमा वाजतगाजत, थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून तिच्यात सोन्याचा नारळ (सोन्याचा मुलामा) ठेऊन नाचत, गात अतिशय आनंदाने मिरवणूक काढून समुद्रकिनाऱ्यावर येतात. सूर्यास्ताबरोबर नारळाची पूजा करून दर्या देवताला नारळ समर्पण करतात. वं प्रार्थना म्हणतात. “पर्जन्य वर्षावाने उधाणलेल्या दर्यादेवा शांत हो वं तुझ्या लाटा सौम्य होऊन आमचे वादळ, तुफान इत्यादीपासून रक्षण कर.”

हिंदू धर्मात पूजाविधीत नारळाला फार महत्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळाच्या बहुविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता मिळाली आहे. नारळात अनेक ओषधी गुण आहेत. शरीराचा दाह,उष्णता कमी करण्यासाठी ओले खोबरे खावे. रक्त पडल्यास साखर खोबरे खावे रक्त पडावयाचे थांबते. खोकल्यातून रक्त आल्यास मनुक्याबरोबर खोबरे खावे. ओले खोबरे खाल्ल्यास जास्त तहान लागत नाही. नारळाचे दूध बळ वाढविते. पाणी लघवी साफ करते, तूप अर्धांगावर उपयोगी आहे. तेल केसांची निगा राखते, चोथा सूज उतरवतो तर चोथा जाळून मधातून घेतल्यास उलटी,उचकी थांबते. इतकेच काय तर करवंटीदेखील उगाळून वा पेटवून तव्यावर ठेवल्यास त्याचे जे तेल येते त्याने खरूज नायटयासारखे त्वचारोगही बरे होतात. नारळाच्या झाडाच्या फांद्या व खोडापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात. म्हणूनच माडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.

अशा या नारळी पौर्णिमेचा दुहेरी उद्देश आहे जे व्यवस्थीत समजून घेऊनच आपण हा सण साजरा केला पाहिजे.
पाहिला  उद्देश…

नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा अर्थात वृक्षवल्ली आम्हा सोयरीप्रमाणे झाडे लावा झाडे वाचवा.

व दुसरा उद्देश…

जलदेवता म्हणजेच सागर वं पर्जन्याबद्दल कृतज्ञता बाळगा.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

नागपंचमी रक्षाबंधन

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere

प्रतिक्रिया
 1. अनिकेत म्हणतो आहे:

  हम्म.. माझे बालपण कोकणातले, त्यामुळे नारळी पोर्णीमा सण मनात इतका घट्ट बसला आहे की विचारु नकोस.

  उधाणलेल्या / खवळलेल्या समुद्राला नारळ अर्पण करुन त्याची पुजा केली जाते. त्यामागे बहुदा असेही एक कारण असते की पावसाळी दिवसांत खवळलेल्या समुद्रात नौका न्हेता येत नाहीत. त्यामुळे मासेमारी जवळ-जवळ बंदच असते.

  नारळी पोर्णीमेला समुद्राची पुजा करुन त्याला शांत होण्याची विनंती केली जाते, जेणेकरुन मच्छीमारांना त्यांच्या नौका पुन्हा एकदा मासेमारीसाठी समुद्रात न्हेता येतील.

  सजल्या सवरलेल्या कोळीणी आणि नटलेले, उत्साही कोळी लोक ह्यांना समुद्रकिनारी पहाणे एक पर्वणीच होती.

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   अनिकेत नशीबवान आहेस…बालपण कोकणात तेही समुद्रकिनाऱ्यावर गेले..आम्ही मुंबईत राहूनही समुद्र काय तो फक्त सणासुदीच्या पुरताच तोंडी लावायचा…असो
   इतक्या झटपट प्रतिक्रियेबद्दल खरंच तुझे खूप आभार… 🙂

   • अनिकेत म्हणतो आहे:

    ढगाळलेले आकाश, समुद्राच्या दुधाळ तुफान लाटा, हिरव्यागार नारळाच्या झाडांची किनार असलेला समुद्रकिनारा, त्यावर व्हाब्रंट रंगाच्या साड्या आणि फुलांचे गजरे घातलेल्या कोळीणी तर खास ठेवणीतले कपडे घालुन सजलेला कोळीराजा. कुठलेही कर्णकर्कश्श संगीत नाही. आणि सोबत नारळी भात, नारळाच्या करंज्या आणि नारळी बर्फीचा नैवेद्य.

    अहाहा झंम्प्या स्वर्गसुख ह्याहुन दुसरे ते काय असते??

 2. Asmita Pawar Mendhe म्हणतो आहे:

  मी कालच कोकणातुन परत आले.
  खरेतर यावेच वाटत नव्हते.वाटत होते की अजुन १ दिवस राहुन तिथली नारळी पोर्णिमा बघावी
  कारण नारळी पोर्णिमा म्हटले की कोकणची आठ्वन येतेच.
  पण ओफिस्मुळे काही गोष्टी मनात असुनही करता येत नाही.
  बाकी नेहमीप्रमाणेच पोस्ट छान झाली आहे.

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   नमस्कार अस्मिताजी पोस्ट आवडल्याबद्दल खूप धन्यवाद.
   हल्लीच्या जगात हे सगळे सण एन्जोय करायचे असतील तर लहानच राहायला हवे.
   मोठे झाल्यावर हे सगळे आनंद विसरायचे नाहीतर फक्त आठवायचे.
   अशी आपली अवस्था झाली आहे.

 3. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

  आपले सण समजून घ्या..हे अगदि झकास काम करतो आहेस तु…छान माहिती..हे सदर प्रत्येक सणाला असच फ़ुलु दे…

 4. ARUNAA ERANDE म्हणतो आहे:

  आपले सगळे सण निसर्गचक्रावर आधारित आहेत. पावसाळा सम्पून हवा जरा निवळलेली असते आणी समुद्र थोडा शान्त होतो. अशावेली इतके दिवस बान्धून ठेव्वलेल्या होड्या परत समुद्रात घालायच्या आधि त्याची पूजा म्हणून हा सण या वेळी येतो.
  यावेळी समुद्राला नारळ अर्पण करतात. यामागे आपाअल्या पूर्वजान्चा नारळाचे replantation असाही एक विचार असावा काय?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s