मातृदिन (पिठोरी अमावस्या)…. आपले सण समजून घ्या

Posted: सप्टेंबर 8, 2010 in आपले सण समजून घ्या
टॅगस्, , , , , , , ,

खरतर कालच हा लेख पोस्ट करायचा होता पण काही कारणांमुळे राहिला. तरी आज पोस्ट करत आहे.

मातृदिन (पिठोरी अमावस्या)


ज्या संस्कृतीत गुरुची पूजा होते. प्राण्यांची पूजा होते इतकेच काय पण निर्जीव वस्तूंचीदेखील पूजा होते ती संस्कृती मातेला कशी विसरेल. अशा या मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या होय.

श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जीला अपत्यसुख लाभत नाही, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात. हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ठ योगिनी या  त्याच्या देवता आहेत.

श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्रमंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करावी, त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्तीदेवतेच्या मूर्ती स्थापाव्यात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन करावे. या  चौसष्ठ योगिनी म्हणजे उपजीवेकेसाठी उपयुक्त चौसष्ठ कलाच आहेत. त्याचीच ही प्रतिके आहेत. त्यांचीच पूजा करावी. व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात.

अशी ही स्त्रीला पुत्रवती बनविणारी अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. श्रावण वद्य अमावास्येलाच  ‘दर्भग्रहणी अमावस्या’ म्हणतात.

आपल्या संस्कृतीत मातेला फार महत्व आहे, तिचा मोठा गौरव केला आहे. आई ही केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्कारांचीही जननी आहे. आई ह्या दोन अक्षरी छोटयाशा शब्दात विश्वाला गवसणी घालण्याचे अतूट सामर्थ्य आहे. वात्सल्य वं त्यागाची मूर्ती म्हणजे आई होय. अशी ही आई एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही. म्हणूनच तिला ‘माऊली’ असे आदराने म्हणले जाते.

समाजात स्त्रियांचे महत्व समजण्यासाठी घरोघरी भाऊबीज, रक्षाबंधनाप्रमाणे  मातृदिन साजरा झाला पाहिजे. जी माता आपल्या मायेने, त्यागाने, ममत्वाने मुलांची, घरादाराची सेवा करते तिच्याविषयी योग्य ती जाणीव समाजाला होऊन तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे.

जर आपण नागपंचमी थाटात साजरी करू शकतो तर आपल्याला जन्म देणाऱ्या जननीच्या त्यागाचा, सेवेचा, समर्पणाचा, ओदार्याचा मातृदिन उत्साहात साजरा करून तिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अर्पूया हाच मातृदिनाचा खरा संदेश आहे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

नागपंचमी पोळा (बेंदूर)

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere

प्रतिक्रिया
 1. Vidyadhar म्हणतो आहे:

  झंप्याभाऊ,
  मी तुझे ब्लॉग्ज वाचतो बरेचदा…
  ही सणांची माहिती देऊन तू चांगलं करतोस…आवडलं आपल्याला! बाकीही चांगला आहे ब्लॉग!

 2. झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

  विद्याधर एकदाची प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रे…. तुझ्याही लिखाणाचा मी जबरदस्त चाहता आहे. “इट जस्ट कुड हॅव बीन हिज मास्टरपीस” हा तुझा मी वाचलेला पाहिला लेख. तेंव्हाच खरतर मी भारावून वगैरे जातात न तसा काहीतरी झालेलो… तुझ्यात खरोखर एक फार मोठा लेखक वं निरीक्षक दडलेला आहे. फक्त तू त्याला संधी द्यायला हवीस…बघ तो काय करतो मग..असो…

  येत रहा असाच..वाट पाहीन.. 🙂

 3. आकांक्षा म्हणतो आहे:

  नमस्कार झम्प्या,
  मी आपल्या दोन पोस्ट वाचल्या, पिठोरी अमावस्या व गोकुळ अष्टमी. मी माझ्या ब्लॉगवर या दोन्ही विषयांबद्दल लिहिले आहे.
  तुम्ही लिहिलेली माहिती अधिक चांगली वाटली.
  तरी एकदा माझ्या ब्लॉगला भेट देऊन बघा व मार्गदर्शन करा.
  http://marathiakanksha.blogspot.com/

  धन्यवाद.

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   धन्यवाद आकांक्षा!
   तुमच्याही ब्लॉगला भेट देऊन आलो…फारच छान वाटले…आपल्यासारखेही काहीजण भेटलेकी आनंदच होतो. तुमच्या ब्लोगवरही खूप चांगली, उपयुक्त व वेगळी माहिती आहे.

   मार्गदर्शन करण्याइतका मी मोठा नाही. मी माझ्यापरीने जास्तीत जास्त माहिती देऊ शकतो.

 4. सौरभ म्हणतो आहे:

  अरे ह्या ६४ कलांची माहिती भारी आहे!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s