हरतालिका….आपले सण समजून घ्या.

Posted: सप्टेंबर 9, 2010 in आपले सण समजून घ्या
टॅगस्, , , , , , , , ,

हरतालिका


आपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत. त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात.

हरतालिकेला नदी वा समुद्रातून वाळू आणून मैत्रीण, पार्वती वं तीन शिवलिंगाची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करतात. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. फलाहार करतात. रात्री कथाकथन, जागरण करून सकाळी उत्तरपूजा करतात. देवीला खिचडीचा नैवद्य दाखवून देवीचे विसर्जन करतात.

हे व्रत भक्तीभावाने, निष्ठेने केल्यास मुलींना आपल्या मनाजोगा वर, अखंड सौभाग्य, आरोग्य, संतती वं संपत्तीचा लाभ होतो.

हरतालिका हे पार्वतीचे नाव आहे. पार्वतीने प्रबळ इच्छाशक्तीने तपश्चर्येने आपल्या मनाजोगता पती मिळविला. हे करताना तिला “आली” नावाच्या मैत्रिणीने मदत केली. आलीच्या मदतीने हर पती मिळाला म्हणून पार्वतीचे नाव हरतालिका पडले.

ह्या व्रताची कथा मुलीसाठी प्रेरणादायक आहे. हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वतीदेखील म्हणतात. हिला भगवान विष्णूचे मागणे घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. ह्या सुवार्तेने हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण पार्वती तर खूप आधीपासून भोळे सांब म्हणजेच श्री शंकराला वरून बसली होती. मनातल्या मनात तीने सदाशीवालाच आपला पती मानले होते.

पित्याने विष्णूशी लग्न ठरविल्यामुळे ती आपली मैत्रीण आली हिला घेऊन अरण्यात निघून गेली. तिथे तीने कठोर तपश्चर्या व शिवाच्या अखंड चिंतनाने,  उपासनेने शंकराला प्रसन्न केले. व आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटले.

ही बातमी कळताच हिमालयाने भगवान शंकराला आमंत्रण देऊन शिव पार्वतीचा मंगल विवाह सोहळा घडवून आणला. अशा तऱ्हेने पार्वतीने आत्यंतिक प्रेमाने, निष्ठेने शंकराला मिळविले म्हणून लोक शंकराला ‘पार्वतीपतये’ असे म्हणू लागले. पार्वतीने शंकराच्या गुणांवर प्रेम केले. शंकर भोला होता पण कलागुणी, कर्तबगार, तपस्वी, शक्तीमान, दयाळू  होता.

हल्लीच्या मुलींनी वं त्यांच्या पालकांनीदेखील या सणातून शिकण्यासारखे आहे. फक्त संपत्ती, ऐश्वर्य वा दिखाऊपणावर जाऊन लग्नाचा निर्णय घेऊ नये तर मुलाच्या कर्तबगारीवर, गुणांवर, कर्तुत्वावर विश्वास ठेवावा. ऐश्वर्याची खात्री देता येत नाही परंतू सदगुणांची खात्री देता येते. हाच खरा हरतालीकेचा संदेश आहे.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

मातृदिन (पिठोरी अमावस्या) पोळा

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere

प्रतिक्रिया
 1. Nachiket म्हणतो आहे:

  उपक्रम चांगला आहे. ब-याच जणांना (“आजकाल” नव्हे..पूर्वीही..नुसती क्रिया करून त्यामागचा उद्देश किंवा अर्थ कळला असं होत नाही..) हे सण आणि त्याच्यामधली रिच्युअल्स माहीत नसतात. वैयक्तिकरित्या देवावर विश्वास असला नसला तरी जे काही चालत आलंय ते नेमकं काय आहे हे माहीत करून घ्यायची ज्याची इच्छा आहे, त्याला ते मिळालं पाहिजे.

  गुड..

  • महेंद्र म्हणतो आहे:

   मला पण खरंच माहिती नव्हतं या बद्दल. म्हणजे का करतात हे व्रत म्हणून..

   • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

    काका मलाही फारशी माहिती नव्हती म्हणून प्रयत्नपूर्वक मिळवली.
    आपण कर्मकान्डाना प्रमाणापेक्षा जास्त महत्व न देता त्यामागील हेतूला, भावनेला महत्व देणे जास्त गरजेचे आहे असे वाटले म्हणून ही माहिती इथे द्यायला सुरवात केली.

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   नचीकेतजी देवावर माझाही विश्वास नाही. देव ही एक संकल्पना आहे समजाच्या सोयीसाठी फार हुशार लोकांनी केलेली. असो हा एक फार वेगळाच आणी वादाचा मुद्दा आहे.

   आपण सण म्हणून जे काही साजरे करतो ते का व कशासाठी माहित झाले तर ते साजरे करताना आणखी मजा येईल व त्यांचा मुख्य हेतूपण साध्य होईल म्हणून माझ्या परीने आपला थोडासा हातभार…. 🙂

 2. Nachiket म्हणतो आहे:

  Add on:

  उलट्या प्रकारे आता हीच चिकाटी (खूप थोडी का होईना) मुलं “आवडत्या पोरीला” आपली पत्नी बनवण्यासाठी करतात..कठोर तपश्चर्येला पर्याय नाही.

  बाकी ते “पती” मिळवण्यासाठी इतकी धडपड वगैरे हे आता एनआरआय पतीच्या बाबतीत उरलंय…:)

 3. ngadre म्हणतो आहे:

  Deva vishayeeche vichar jabardast jultahet ase vatate.

  Ya baabteet lahanpani roj pooja archa, atharv sheersh vagaire vala mee pudhe umaj padoo laaglyaavar itakaa vegala banalo ki yanv re yanv..

  Taka ekhaadee post yaavar.

  Houn jaude baar charchechaa.

  Ki mee takoo?

 4. Milind Vaman Karkhanis म्हणतो आहे:

  Sept. 10th, 2010, 08-40 pm vaajtaa zampyaa zapaatlelaa yaanchyaa naavaane jee pratikriyaa aalyey, tyaa-var khaaleel maahitee dene uchit vaat-te —

  maazyaa maahitee pramaane aaplyaa saunskruteet devachee sankalpanaa ashee aahe – saunskrut dhatu ‘dyu’ mhanaje prakaashne. tyaachyaa paasoon ‘dev’ ( mhanaje prakaashnaaraa ) haa shabda zaalaa. jyaachyaa yoge indriyaannaa jaaneev ho-oon aakalan hote va itar anubhav yetaat, to prakaash. e.g. sooryaachyaa prakaashaa mule dolyaannaa disate va tyaatoon vividh anubhav yetaat va dnyaan praapta hote. tyaamule kaahee shakteenchee jaaneev hote. ashaa naisargik shaktee, jyaa jaanavlyaa, tyaannaa ‘dev’ mhananyaachee prathaa padlee. te tehetees prakaarche aahet – dwaadasha aaditya (baaraa raasheen madhoon prakaashnaaraa soorya), ekaadash rudra (he nemke kaay aahe te tapaasaaylaa paahije), ashta vasu (aath dishaa), indra (havaa ani paaoos yaanchaa niyantrak) ani brahma (saglyaanchaa nirmaataa), ase ekoon tehetees. koti mhanane prakaar. mhanoon tehetees koti. (ithe koti chaa artha ‘shambhar laksha’ navhe.)

  yaa vyatirikta jyaa jyaa manushyamaatraannee tyaa tyaa kaalaat alaukeek samaaj-kalyaankaaree krutye kelee, tyaannaahee ‘dev’ maananyaachee va tyaanchee aaraadhanaa karanyaachee prathaa padlee. tyaanusaar vishnoo, mahaadev, durgaa, raam, krushna, ityaadi ‘dev’ zaale. aapan santaannaahee dev-tulya maanto. jyaannaa jyaannaa ase dev maanoon poojnyaat samaadhaan milte, te te tase kartaat. barech lok tase kareet-hee naheet. haa jyaachyaa tyaachyaa manaachaa prashna aahe. tyaat kunee kunaavar sakti karanyaachaa prashnach yet naahee. pan aaplyaa madhe swaarthee lokaanchee uneev naaheeche. te kunaache aikteel asehee naahee. tyaannaa kon rokhnaar?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s