त्रिपुरी पौर्णिमा….आपले सण समजून घ्या

Posted: नोव्हेंबर 22, 2010 in आपले सण समजून घ्या
टॅगस्, , , , ,

त्रिपुरी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा)

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानात जे दीपस्तंभ (उंच दगडी दिवे) असतात ते सुद्धा पेटवितात. या दिपोत्सवालाच त्रिपुर पाजळणे असे म्हणतात.

तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण शेवटी असुर ते असुरच त्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्रीशंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरु झाली.

कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असे म्हणतात.

जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.

प्रतिक्रिया
 1. ngadre म्हणतो आहे:

  mitra te blogs ani bloggers vishayi lihinar ahes mhanoon amhala ‘stay tuned’ karun thevalayas..

  Kadhi yenaar te?

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   नचिकेत साहेब खरतरं मला त्या दोनच दिवसात तो लेख लिहायचा होता. परंतू अचानक काही कामानिमित्त मुंबईबाहेर जावे लागले. त्यामुळे मी अगदी थोडावेळच ऑनलाईन येबू शकलो. तो लेख लिहिण्यासाठी मला थोडा (खरतरं थोडा जास्तच) वेळ व निवांतपणा लागेल. रविवारी संध्याकाळपर्यंत मी पुन्हा मुंबईत येईन. तेंव्हा त्यावर नक्की लिहिणार आहे.
   till then once again really sorry to say please please….stay tuned.
   THANK YOU.

 2. Dhananjay Dughad म्हणतो आहे:

  Hi this is very good website

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s