Archive for the ‘इंटरनेट’ Category


मार्केटिंग ही एक कला आहे की शास्त्र आहे?

यावर तज्ञांमध्ये बरेच मतभेद आहेत…राहतील…परंतू हल्लीच्या युगात मार्केटिंग ही फक्त एक आवश्यकता नव्हे तर गरजच झाली आहे. आपले प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचावे यासाठी प्रत्येक कंपनी सतत काहींना काही उपाय योजत असते, मार्ग शोधीत असते…वेगवेगळया माध्यमांचा यासाठी उपयोग केला जातो. सध्या इंटरनेटमुळे नवनवीन इनोवेटिव कन्सेप्ट्स राबविणे सोपे झाले आहे….खूप वेगवेगळया प्रकारे कस्टमरला आपल्या प्रोडक्टबरोबर कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. कमीत कमी वेळात तुमच्या मनाला भावेल, आवडेल, उद्दपिद करू शकेल अशा जाहिराती बनविण्यात येतात…परंतू फारच कमी कंपन्यांना/जाहिरातींना हे शिवधनुष्य पेलवते. परदेशांच्या तुलनेत आपल्याकडील जाहिराती याबाबतीत बऱ्याच उजव्या ठरल्या आहेत.

परंतू आज मी नेटवर LG Portugal च्या  Life Is Good या थीमवर आधारलेल्या जाहिरातीचा विडीओ बघितला…खरेतर ह्या व्हिडीओला आपल्या पारंपरिक जाहीरातीच्या व्याख्येत नाही बसविता येणार कारण हा व्हिडीओ चक्क साडेसात मिनिटे लांबीचा आहे. आता इतकी मोठी जाहिरात कोण पहाणार? इतका वेळ आहे कुणाला? आम्हाला तर हल्ली काही सेकंदाच्याही जाहिराती पहायचा कंटाळा येतो तेंव्हा साडेसात मिनिटे अरे बापरे….अ..श…क्य….

हेच अशक्य आव्हान काही कंपन्या सहज कसे शक्य करून दाखवितात…त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे खालील व्हिडीओ. तुम्ही हा व्हिडीओ नुसता पाहून सोडू शकणार नाही तर  तो इतरांबरोबर शेअर करावा असाही विचार तुमच्या मनात सुरु होईल…आणि काहीच क्षणात तुम्ही तो शेअरही केलेला असेल…जसा आत्ता मी येथे केला आहे.

आणि म्हणूनच आजच्या पोस्टचे हे टायटल आहे…असे काहीतरी बनवा जे लोकांना मित्रांबरोबर शेअर करावेसे वाटेल…तुमच्या ग्राहकाला फक्त तुमची वस्तू न विकता एखाद्या कसलेल्या कलाकारासारखे त्याचे मनोरंजन करणे, त्याची भावनिक गरज पूर्ण करणे व ही उचंबळून आलेली भावना (फिलींग ) त्याला इतरांबरोबर शेअर करायला भाग पाडणे हेच आजच्या युगातील यशस्वी कंपन्याचे मुख्य रहस्य आहे व असेल…

——————————————————————————————————————————————————

खालील लेख वाचण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

…….…….

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere


जर तुम्ही इंटरनेटवरून भरपूर काही डाउनलोड करत असाल तर रॅपिड्शेअर तुम्हाला चांगलेच परिचयाचे असणार. आणी जरी तुम्ही याबद्दल अनभिज्ञ असाल तरी हरकत नाही झम्प्या येथे तुम्हाला यां जगप्रसिद्ध आणी सर्वात लोकप्रिय अशा फाइल सर्विस वेबसाईटची माहिती देणार आहे.

इंटरनेट वर डॉक्युमेंटस , व्हिडियो फाइल्स,  गेम्स,  मूवीज वा इतर कोणत्याही प्रकारची माहिती वा फाईल्स शेअर वा डाऊनलोड करण्यासाठी करोडो युजर्स रॅपिड्शेअरचा उपयोग करतात. आता आपण पण तो करणार आहोत आणी तोही एखाद्या प्रो सारखा. तो कसा?

रॅपिड्शेअर ही एक पेड आणी फ्री दोन्ही प्रकारची सर्विस आहे. पेड म्हणजे पैसे भरून काही कालावधीकरिता ही सर्विस वापरता येते. तर फ्री मध्ये पण तुम्ही ही सर्विस वापरू शकता परंतु त्यात काही अडचणी आहेत आणी त्यां मुद्दामच ठेवल्या आहेत जेणेकरून तुम्ही पेड सर्विस वापरावी. पण शेरास सव्वाशेर याप्रमाणे ह्या अडचणींवर मात करण्यासाठी काही ट्रिक्स पण आहेत. आणी त्याच आपण येथे जाणून घेणार आहोत.

प्रथम आपण अडचणी समजूया.  स्लो स्पीड, एका वेळेला एकच फाइल डाउनलोड, टाईम वेट (काही काळ थांबा), कॅप्चा इमेज इत्यादी अडचणी फ्री रॅपिड्शेअरमध्ये येतात. आता त्यां दूर करण्यासाठी खालील टूल्स आपण वापरणार आहोत.

काही काळ थांबा (टाईम वेट) स्कीप करण्यासाठी तुम्ही

जर फायरफॉक्सचा वापर करत असाल तर SkipScreen नावाच्या add on चा वापर करू शकता.

जर तुम्ही दुसरा कोणताही ब्राउजर वापरत असाल तर

jDownloader चा उपयोग करा. jDownloader हे एक जावा बेसड अप्लीकेशन आहे

व मेमरीही खूप कमी खाते. ह्यात resume download चे पण ऑप्शन आहे.

पण कधी कधी ते रीज्युम केल्यावरही ERROR MESSAGE देते. त्यामुळे शक्यतो तुम्ही पूर्ण डाउनलोड झाल्याशिवाय हे बंद करू नका.

जर तुम्हाला एका वेळेला अनेक फाईल्स डाउनलोड करावयाच्या असतील तर

त्यासाठी थांबण्याचीही काही एक आवश्यकता आता नाही.

तुम्ही फक्त Rapidshare Auto Downloader हा एक छोटासा फ्री प्रोग्राम् इन्स्टॉल करायचा.

हा एक अफलातून प्रकार आहे. जरूर वापरून बघा.

त्याचबरोबर Rapidshare Download Accelerator हे एक आणी RapGet नावाची टूल्सपण तुम्ही ट्राय करू शकता.

तर तुम्ही आता तयार आहात वाटेल तितके आणी वाटेल तेंव्हा डाउनलोड करायला.
तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे. आजकाल इंटरनेट ही एक गरज झाली आहे. हल्ली जवळजवळ प्रत्येक ठीकाणी इंटरनेटचा वापर केला जातो. बँक्स्,शॉपिंग, शिक्षण, उद्योगधंदे, संगीत अशा नानाविवीध ठीकाणी इंटरनेट अत्यावश्यक झालेले आपण बघतो, वापरतो. पण आपल्यापैकी फारच कमी जणांना इंटरनेटबद्दल माहीती असेल. इंटरनेट हा नक्की काय प्रकार आहे व तो केंव्हा, कोणी व कसा सुरु केला. हे जर तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात (फक्त आठ मिनीटात) जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक अफलातून शैक्षणिक विडीओ झम्प्या येथे शेअर करित आहे. त्याचा जरूर लाभ घ्यावा.

झम्प्याचा फंडा : ह्या विडीओची जर तुम्ही पारायणे केलीत तर उद्या अचानक इंटरनेट्बद्दल काही बोलायची वेळ आली तर नक्कीच इंम्प्रेशन पाडाल.