Posts Tagged ‘आपल्या काळातील विरोधाभास’


आपल्या काळातील विरोधाभास हा आहे की आपल्या इमारती तर खूप उंच झाल्या पण आपली मने शुद्र झाली आहेत..आपले रस्तेतर खूप रुंद झाले पण दृष्टीकोन तितकेच संकुचित झाले.  आपण  खर्च तर भरपूर करत आहोत पण आपल्याकडे खास असे काहीही नाही. आपण खरेदी खूप करतो पण त्यातून आनंद मिळत नाही. आपली घरे जितकी मोठी झाली तितकेच आपले कुटुंब छोटे झाले. आपल्या सुविधा तर वाढल्या पण वेळ मात्र कमी झाला. आपल्याकडील महाविद्यालये पदव्या तर भरमसाठ वाटतात पण समज कोणत्याच शाळेत शिकवली जात नाही. वाद विवादांची संख्या वाढली पण निर्णय घ्यायची क्षमता कमी झाली. आजूबाजूला विशेषज्ञ खूप आहेत पण समस्या काही कमी होत नाही. औषधांनी कपाटांचे रकानेच्या रकाने भरले पण आरोग्याला जागा उरली नाही.

आपण खूप पितो. खूप धूरपण काढतो. पैसा पाण्यासारखा खर्च करतो पण हसताना मात्र कंजुषी करतो. गाडी जितक्या वेगात चालवतो तितक्याच वेगात नाराजपण होतो. रात्री उशिरापर्यंत जागतो सकाळी उदास थकलेले उठतो. वाचनाशी आपला संबध उरला नाही. टी.व्ही. चे मात्र भक्त झालो. प्रार्थना तर आपण विसरूनच गेलो. संपत्ती आपण कैकपटीने वाढवली पण त्याचबरोबर किंमत आपली कमी झाली. बोलायला तर खूप लागलो. प्रेमाची भाषा विसरलो आणी तिरस्काराची भाषा मात्र शिकलो.

जीवन कसे व्यतीत करायचे हे आपण व्यवस्थित शिकलो पण ते जगायलाच विसरलो. आपल्या आयुष्यातील वर्षे वाढली पण त्यातील जिवंतपणा कमी झाला. चंद्रावर फेऱ्या मारून आलो पण रस्ता ओलांडून नवीनच रहायला आलेल्या शेजाऱ्याकडे जायला कंटाळलो. बाह्याजगात भरपूर भटकलो पण आत्मजगाचा पत्ता हरवलो.

आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. पण चांगल्या कीती केल्या ते माहीत नाही. हवेला तर आपण स्वच्छ केले पण आत्म्याला मात्र प्रदूषितच ठेवले. अणूवर तर जय मिळविला पण पूर्वग्रहापासून सुटलो नाही. लिहून खूप काही ठेवले पण शिकलो मात्र खूपच कमी. योजना तर मोठ्या बनवल्या प्रत्यक्षात मात्र उतरल्या कमी. घाई गडबड इतकी शिकलो की संयम हा शब्द्पण विसरलो. आपण कॉम्पुटर तर बनविले जे आपले काम करतील पण त्यांनी आपले मित्रच हिरावले.

आपलं खातो फास्टफूड पण ते लवकर पचत नाही. शरीर मोठे पण चरित्र छोटे झाले आहे. नफा वाढला पण नाती तुटली. कुटुंबाचे उत्पन वाढले पण त्याचबरोबर घटस्फोटही वाढले. घरं जितकी सुंदर झाली तितकीच आतून तुटली.

हा काळ आहे चुटकीसरशी कुठेही जाऊन फिरून येवू शकण्याचा, डिस्पोजेबल डायपरसचा, नैतिकतेची ऐसीतैसी करण्याचा, एका रात्रीपुरत्या संबंधांचा, बेढब शरीरांचा आणी अशा गोळ्यांचा ज्या काहीही करू शकतात एका क्षणात उत्साह तर दुसऱ्या क्षणात शांत इतकेच नव्हे तर क्षणात मृत्युही देवू शकणाऱ्या.

हा काळ आहे शानदार दुकानांच्या दर्शनी भागात खाचाखच भरलेला माल दिसण्याचा पण गोदामे रिकामी असण्याचा. एका क्लिकमध्ये तुम्ही हे वाचू शकता, एका क्किकमध्ये दुसऱ्याला वाचवू शकता. तर एका क्लिक मध्ये डिलीटही करू शकता.

लक्षात ठेवा: आपल्या जवळच्या लोकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. कारण उद्या ते तिथे असणार आहेत की नाही ह्याची कोणतीही खात्री नाही. विसरू नका: तुमच्याकडे अपेक्षेने बघणाऱ्या लहानातल्या लहान मुलाबरोबर पण प्रेमाने बोला. कारण लवकरच ते मूल मोठे होवून तुम्हाला सोडून जावू शकते.

जवळच्यांना प्रेमाने आलींगन द्यायाला विसरू नका कारण ती एकच अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या हृदयाने देवू शकता व त्यासाठी तुम्हाला एका दमडीचाही खर्च येत नाही.

माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे हे जादुई वाक्य नुसते तोंडाने बोलू नका तर कृतीतून पण व्यक्त करा.

तुमच्या खूप आतून आलेले दोन प्रेमाचे शब्द वा आलींगन खूप जुन्या व कडवट जखमा भरू शकतात.

एकमेकांचे हात सोडू नका. प्रत्येक क्षण साजरा करा. कदाचित तुम्ही शेवटच्याच वेळेला हात हातात घेत असाल.

प्रेमासाठी वेळ द्या. स्वत:ला व्यक्त करण्यासाठी वेळ द्या. तुमच्या मनातील भावनाना इतरांपर्यंत पोचवण्यासाठी वेळ द्या.

आणी हे तर अजिबात विसरू नका:

आयुष्य श्वासात मोजू नका उलट अशा क्षणांना कैद करा ज्यांनी तुमचा श्वासच हिरावून घेतला होता.

आयुष्य हे श्वासात मोजण्यासाठी नसते तर अशा क्षणासाठी असते जे तुमचे श्वासच हिरावून घेतात

आणी आता हा निरोप तुम्ही फक्त आठ लोकांपर्यंतपण पोचवू शकला नाहीत तरी कोणाला त्याची फिकीर आहे.

————————————————————————————————————————————————–

हा मेसेज (निरोप) इंटरनेट वर गेल्या १० वर्षांपासून भटकतोय. ह्याच्या मूळ लेखकाचे नाव पत्ता कोणालाच खात्रीशीर माहित नव्हता. जॉर्ज कार्लिन चा संदेश ह्याच नावाने हा निरोप इतकी वर्षे भटकत होता. परंतु आता सत्य समजले आहे. हा लेख डॉक्टर मूरहेड यांनी १९९० मध्ये लिहिला होता आणी नंतर १९९५ साली त्यांच्याच ‘WORDS APTLY SPOKEN’ ह्या पुस्तकात प्रसिद्ध झाला होता. हा मूळ संदेश इग्रंजीत कोणाला वाचायचा असेल तर खाली देत आहे.

—————————————————————————————————————————————————

The paradox of our time in history is that we have taller buildings but shorter tempers, wider Freeways but narrower viewpoints. We spend more, but have less, we buy more, but enjoy less. We have bigger houses and smaller families, more conveniences, but less time. We have more degrees but less sense, more knowledge, but less judgment, more experts, yet more problems, more medicine, but less wellness.

We drink too much, smoke too much, spend too recklessly, laugh too little, drive too fast, get too angry, stay up too late, get up too tired, read too little, watch TV too much, and pray too seldom.

We have multiplied our possessions, but reduced our values. We talk too much, love too seldom, and hate too often.

We’ve learned how to make a living, but not a life. We’ve added years to life not life to years. We’ve been all the way to the moon and back, but have trouble crossing the street to meet a new neighbor. We conquered outer space but not inner space. We’ve done larger things, but not better things.

We’ve cleaned up the air, but polluted the soul. We’ve conquered the atom, but not our prejudice. We write more, but learn less. We plan more, but accomplish less. We’ve learned to rush, but not to wait. We build more computers to hold more information, to produce more copies than ever, but we communicate less and less.

These are the times of fast foods and slow digestion, big men and small character, steep profits and shallow relationships. These are the days of two incomes but more divorce, fancier houses, but broken homes. These are days of quick trips, disposable diapers, throwaway morality, one night stands, overweight bodies, and pills that do everything from cheer, to quiet, to kill. It is a time when there is much in the showroom window and nothing in the stockroom. A time when technology can bring this letter to you, and a time when you can choose either to share this insight, or to just hit delete…

Remember; spend some time with your loved ones, because they are not going to be around forever.

Remember, say a kind word to someone who looks up to you in awe, because that little person soon will grow up and leave your side.

Remember, to give a warm hug to the one next to you, because that is the only treasure you can give with your heart and it doesn’t cost a cent.

Remember, to say, “I love you” to your partner and your loved ones, but most of all mean it. A kiss and an embrace will mend hurt when it comes from deep inside of you.

Remember to hold hands and cherish the moment for someday that person will not be there again.

Give time to love, give time to speak! And give time to share the precious thoughts in your mind.

AND ALWAYS REMEMBER:

Life is not measured by the number of breaths we take, but by the moments that take our breath away.

If you don’t send this to at least  8 people….Who cares?

Share on Facebook

Share

Yahoo Buzz Yahoo Buzz

Google Buzz Google Buzz

Add this anywhere Add this anywhere