Posts Tagged ‘कशी व का’


मित्रांनो मी हा ब्लॉग नुकताच सुरु केला आहे. प्रत्येकाला ब्लॉग सुरु करण्याआधी जो प्रश्न पडतो तोच प्रश्न मला पण पडलेला तो म्हणजे की कोणत्या गोष्टीबद्दल लिहावे?. रोज रोज लोकांनी  आपल्या ब्लॉगला भेट द्यावी, आपले पोस्ट्स (लेख) वाचावेत असे जर वाटत असेल तर काय व कोणत्या विषयाबद्दल लिहावे? कारण मुळात आपण काही लेखक नाही की फक्त आपल्या लेखनाच्या जोरावर वाचकांना खेचून आणू शकू. म्हणून जरा गुगल केले व  ब्लॉगिंगसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. त्या खाली देत आहे….

ब्लॉगिंगचे सर्वात महत्वाचे सूत्र म्हणजे स्वत:ला काही प्रश्न अगदी सुरवातीलाच विचारा…मला काय आवडते? माझे छंद काय आहेत? मला काय करायला जास्त मजा येते? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या सध्या मला माहीत नसल्या तरी त्याबद्दल जाणून घ्यायची माझी खूप मनापासून इच्छा आहे. मग ते काहीही असू द्या.

तर मग घ्या कागद पेन वा उघडा वर्ड आणी करा सुरवात लिहीटयपायला.

तुम्हाला थोडी मदत वा माहिती म्हणून इंटरनेटवरील काही खूप लोकप्रिय अशा विषयांची यादीच मी येथे देत आहे बघा यातील काही तुम्हाला उपयोगी वाटतात का?  एक लक्षात ठेवा की हे विषय इंटरनेटवरील सर्वात जास्त वाचले जाणारे म्हणजेच खपणारे म्हणजेच पैसे मिळवून देणारे विषय आहेत. जर यातल्या एकातल्याचीही  तुम्हाला मनापासून आवड असेल ( ज्याची शक्यता खूपच आहे) तर तुम्ही त्यां विषयातील उपयुक्त आणी दर्जेदार माहिती तुमच्या ब्लॉगमध्ये देऊन एक यशस्वी ब्लॉगर होवू शकता.

त्या लोकप्रिय विषयांची यादी खालीलप्रमाणे…

१)     डेटिंग, सेक्सविषयक सल्ले, नातेसंबध

२)     वजन कमी करणे, सौंदर्य, बॉडी बिल्डिंग

३)     आरोग्य ,आजार, वा काही विशिष्ट प्रकारचे रोग

४)     गुप्तहेरी, ऑनलाईन सुरक्षा

५)     स्वत:ची/कुटुंबाची सुरक्षा

६)     कॉम्पुटर, इंटरनेट कसे वापरायचे?

७)      मानसिक प्रभाव, एखाद्यावर प्रभुत्व कसे मिळवायचे?

८)      स्वयंविकास, व्यक्तिगत विकास आणी  यशस्वी कसे व्हावे,

९)     छंद : पाककला, खेळ, जादू इत्यादी

१०)   पैसे कमविणे: शेअर मार्केट, रियल इस्टेट, गुंतवूणूक वगैरे

वरील यादी ही जागतिक लोकप्रिय विषयाची आहे. मराठी ब्लॉग्ससाठी आणखी काही विषयही ह्यात सामावू शकतात. तेंव्हा आपल्या आवडीनुसार कोणताही विषय तुम्ही निवडू शकता. त्याचबरोबर अजून एक जागतिक आणी सार्वकालीन सत्य कायम लक्षात ठेवा.

“लोक एक तर नेहमीच आपल्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत असतात. किंवा आपल्या अडचणी कशा दूर करता येतील ते बघत असतात.”

ह्या दोन मुख्य गोष्टी प्रमाण मानून इंटरनेटवर लाखो वेबसाईटस करोडो डॉलर्स कमवत आहेत. आणी हे तर हिमालयाचे एक नग आहे. अजूनही खूप काही होयचे बाकी आहे. खूप संधी रोज निर्माण होताहेत. यां क्षेत्रात दर्जेदार उपयुक्त माहितीची खूप मागणी आहे. हे मी इंग्रजी भाषेसंदर्भात बोलत आहे. म्हणजे मराठीत किती बोंब असेल तुम्हीच बघा आणी ही बोंबच एक मोठी संधी आहे हेही विसरू नका. आत्ता कुठे मराठी ब्लॉग्स विश्वाची पहाट होत आहे. येणारा काळ बघितला तर इंटरनेट खूपच अत्यावश्यक सेवेत मोडणार आहे आणी ब्लॉग्स हे एक खूप प्रभावी माध्यम.(इंग्रजीत तरी सध्या हेच चित्र आहे)

ही होती ब्लॉगिंगला कशी व का सुरवात करावी याबद्दलची पोस्ट. आणखीण काही उपयुक्त गोष्टी पुढच्या वेळेस जाणून घेऊया.