Posts Tagged ‘ज्ञानेश्वर’


ब्लॉगिंग संदर्भात माझा अभ्यास चालू असताना एका फोरममध्ये एक इंटरेस्टींग प्रश्न माझ्या वाचनात आला. तो म्हणजे ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का?

तसे मी बरेच ब्लॉग्स रोज फॉलो करतो,वाचतो. त्यातील काही तर चक्क १२-१५ वर्षे वयाच्या मुलांचेपण आहेत. तेदेखील मी जेंव्हा त्यातल्या एकाच्या about me या पेजवर गेल्यावर मला समजले तोपर्यंत मला तो ब्लॉग एखाद्या एक्स्पर्टने लिहिलाय असेच वाटायचे. नंतर मी about me  हे पेज नेहमी चेक करायला लागलो हे विशेष.. तर मुद्दा असा की त्या ब्लॉगरचे वय समजल्यावर माझ्या दृष्टीकोनात काही फरक पडला का? तर उत्तर आहे…होयपण आणी नाहीपण.. आहे की नाही गंम्मत…होय यासाठी की मला आश्चर्य वाटले एवढया लहान वयात पण मुले इतके व्यवस्थीत व नियमित लिखाण करू शकतात. हे पचवायला थोडे अवघड गेले….आणी नाही यासाठी की वयाचा व अकलेचा तसा फार काही संबध असतो असेही मला वाटत नाही. (यांसाठी ज्ञानेश्वरांचे उदाहरण पुष्कळ आहे.)

वय समजल्यावर तर त्यां ब्लॉगरबद्दलचा माझा आदर दुणावला. असो पण अशी उदाहरणे फार नाहीत. पण काही ब्लॉग्सबाबतीत वयाचा फरक नक्की पडत असावा असे मला वाटते. आपल्या भारतीय संस्कृतीत वयाला फार महत्व आहे.(त्याच्या खोलात शिरायची इथे गरज नाही.) आपल्याकडे वय जास्त म्हणजे अनुभव जास्त म्हणजे ज्ञान जास्त….असाही एक समज आहे. त्यामुळेही काही फरक पडत असेल?…मित्रांनो तुम्हाला काय  वाटतं याबद्दल? मांडू शकता तुम्ही काही वेगळे मुद्दे?

बाय द् वे….माझे वय काय असेल तुमच्या अंदाजे?:)