Posts Tagged ‘मत्सर’


आज फेसबुकवर एक लेख आला वाचनात …जाम आवडला.. वाटले…  तुमच्याबरोबर इथे शेअर करावा…
म्हणून जसाच्या तसा इथे देत आहे.  लेखकाचे नाव माहीत नाही.. कोणाला माहित असेल तर कळविणे..
———————————————————————————————————————————————
एक विचार करण्यासारखी गोष्ट……..

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात,

पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर
त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

त्याचे कारण म्हणजे ये तिथीमध्ये शेवटी ‘मी’ येतो,
याच ‘मी’ अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही असा समज आहे,

कृष्णाचं आवडत वाद्य बासरी,
एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,
आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो,
त्याच्या आजूबाजूला वावरतो,
पण तो आम्हाला साधा भावही देत नाही,
तू तर एवढी साधी, ना रूप, ना काही,
पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो,
तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर ?
बासरी हसली आणि म्हणाली “तुम्ही माझ्यासारखे व्हा”
मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल’

अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पहिले,
बासरी पुढे म्हणाली ‘मी अगदी साधी आहे’,
ना एखादी गाठ, ना वळण, मी पोकळ आहे,
त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय,

माझ्या अंगावरच्या सहा भोकातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे
रिपू मी काढून टाकले आहेत,

मला स्वतःचा आवाजही नाही, माझ्या सख्यान फुंकर मारली तरच मी बोलते,
तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते,
गोपी निरुत्तर झाल्या…..

तेव्हापासून त्या बासरीवर रुसून आहेत,

“म्हणूनच असेल कदाचित, पण आपल्याकडे एकही स्त्री बासरीवादक नाही”

“Author unknown”…………

Share on Facebook

Share

Yahoo Buzz Yahoo Buzz

Google Buzz Google Buzz

Add this anywhere Add this anywhere