Archive for the ‘संगणक’ Category


stolen-laptop

मित्रांनो तुम्ही डेस्कटॉप वापरता की लॅपटॉप?  जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर ही पोस्ट वाचणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. हल्ली मोबईल नंतर कशाची जर जास्त चोरी होत असेल तर ती लॅपटॉपची. चोरीला जाण्याची काही ठिकाणे गाडी, ऑफिस, कॉफीशॉप, ग्रंथालयं, क्रॉसवर्ड सारखी दुकाने, थियेटर्स, शॉपींगमॉल व काहींचे तर चक्क घरातूनही चोरीला गेलेत. खिशातला मोबाईल जर चोरीला जाऊ शकतो तर टेबलवर ठेवलेला लॅपटॉप चोरी जायला फारसा वेळ लागत नाही. २/३ मिनिटांसाठी जरी तुम्ही लॅपटॉप समोरून हललात. तर मग देवसुद्धा तुमच्या लाड्क्याची काळजी घ्यायला असमर्थ असतो.

अशा भीतीमुळेच आपल्याला अगदी बाथरूमला जरी जायचे असेल तरी हे ओझे खांद्याला लटकावूनच जावे लागते. कधी कधी( नव्हे…बरेच वेळा) ह्यामुळे प्रचंड गैसोयही होते. पण नवीन लॅपटॉपच्या किमती बघितल्या तर ही गैरसोय आपण नाईलाजाने सहन करत करतो.

पण आता इथून पुढे त्याची गरज नाही. आता तुम्हाला ही गैरसोय झटकता येणार आहे. लॅपटॉपच्या बाबतीत जिथे प्रत्यक्ष देवावरसुद्धा आपण विश्वास ठेवू शकत नव्हतो तिथे आता आपल्या लॅपटॉपच्या संरक्षणासाठी एक छोटासा प्रोग्राम् आपली मदत करणार आहे. आणी ज्यावर विसंबून तुम्ही अगदी कुठेही जाऊ शकता..बोले तो एकदम बिन्धास….आणी तो प्रोग्राम् आहे १ MB पेक्षाही छोटा. आणी तोही चक्क फुकट…

आता तुम्हाला प्रश्न पडला असणार काय आहे हा प्रोग्राम्?.,.आणी कसे वाचवणार तो आमच्या लाड्क्याला चोरीला जाण्यापासून? तर सांगतो…

मित्रानो हल्ली घराला थेफ्ट अलार्म लावतात ते तुम्हाला माहित आहे का? जाउन्द्या आपल्या इथे ही कन्सेप्ट अजून तेवढी रुळली नाहीये म्हणून दुसरे एक कॉमन उदाहरण घेतो. आजकाल रस्त्यांवर खूप इम्पोर्टेड गाड्या बघायला मिळतात (तुमच्याकडेदेखील असेल एखादी? नाहीये…असूंद्या येईल एक दिवस. 🙂 )ह्या गाड्यांना एक अलार्म सिस्टीम असते जर का कोणी गाडीला काहीही कराण्याचा प्रयत्न केला (अगदी नुसता स्पर्श जरी केला) तर एक कर्कश्य आवाज वाजायला सुरवात होतो. तोच हा थेफ्ट अलार्म. ह्याचा अनुभव आपण घेतलाच असाल? बरोबर ना?

LAlarm_1

अगदी सेम थीमवर आपला हा लॅपटॉप अलार्म प्रोग्राम काम करतो. एकदा का त्याला तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केले व त्याच्या सेटींग्स तुमच्या गरजेनुसार सेट केल्या की झाले. बस. आता त्याला चक्क विसरून जायचे. तो तुम्हाला त्याची आठवण तेंव्हाच करून देणार जेंव्हा तुमच्या लाडक्या लॅपटॉपवर काहीतरी संकट येईल…बरं ही आठवणही तो अगदी कर्कष्यपणे करून देणार…की जेणेकरून तुम्ही कुठेही असाल तरी धावत लॅपटॉपजवळ याल.

आता आपण या लॅपटॉप अलार्मची वैशिष्टे बघूया…म्हणजे हा काय काय करू शकतो ते बघूया.

१. थेफ्ट अलार्म – जर कोणी तुमचा लॅपटॉप चोरत असेल तर एक मोठा अलार्म वाजून हा तुम्हाला खबरदार करतो.( तुमची AC केबल चार्जिंगपासून डिसकनेक्ट केली असता वा लॅपटॉप शटडाउन केला असता.)

२. परिमिती अलार्म – जर तुम्ही ठरवून दिलेल्या परीमितीच्या बाहेर जर तुमचा लॅपटॉप जात असेल तर पुन्हा मोठा अलार्म.

३. दुर्लक्ष अलार्म – जर तुम्ही एखाद्या धोकादायक ठिकाणी तुमचा लॅपटॉप जास्त वेळ दुर्लक्षित ठेवला तर तो तुम्हाला अलार्म वाजवून त्याची जाणीव करून देतो.

४. बॅटरी अलार्म – बॅटरीवर अतिरिक्त ताण पडत असेल,किंवा बॅटरी लेवल कमी झाली असेल,किंवा अचानक येणाऱ्या जाणाऱ्या विजेमुळे जें नुकसान होवू शकते त्याची वेळीच अलार्म वाजवून कल्पना देतो.

५. डिस्क अलार्म – जर तुमची हार्डडिस्क खराब झाली असेल तर डाटा लॉस पासून वाचण्याकरिता किंवा लॅपटॉप ऐनवेळी बंद पडणे टाळतो…

६. डाटा नाश करणे – जर तुमचा लॅपटॉप चोरीला गेलाच तर त्यातील संवेदनशील डाटा हा नाहीसा करतो व त्याचा दुरुपयोग होण्यापासून वाचवितो.

७. चोरीला गेलेल्या लॅपटॉपमधील डाटा परत मिळवण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.

८. वर दिलेल्या पैकी काहीही झाले… तर एखाद्या गुणी बाळासारखा लगेच तुम्हाला इमेल वा SMS करून खबर देतो.

९. शिवाय तुम्ही याला अगोदरच पढवून ठेवू शकता की जर लॅपटॉप चोरीला गेलाच तर ह्याने पुढे काय काय करायचे…

तर असा हा अतिशय उपयुक्त प्रोग्राम खरे तर मित्रच म्हणलं पाहिजे याला..असलाच पाहिजे तुमच्या लाडक्या लॅपटॉपमध्ये…

माझा तर आहेच…तुम्ही कधी बनवताय याला तुमचा व तुमच्या लॅपटॉपचा मित्र?

लॅपटॉप अलार्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


विन्डोजXP  ही जरी एक विकत घेवून वापरायची ऑपरेटिंग सिस्टिम असली तरी ९०% भारतीयांसाठी ती  आपल्या असेम्बल्ड संगणकाबरोबर मिळत असलेली एक फुकटची सोय आहे. आणि बऱ्याच जणांचा तर असा ग्रह आहे की जे लोक ही सोय पैसे भरून वापरतात ते एकतर मुर्ख आहेत किंवा पैशेवाले आहेत. तर अशाच ९०% फुकट्या भारतीयांसाठी आजची ही पोस्ट.

जर तुम्ही पायरेटेड विन्डोज वापरत असाल तर Windows Genuine Notification ने तुम्हाला नक्कीच सतविले असणार. सिस्टम ट्रेमध्ये हा मेसेज तुम्हाला आठवण करून देत राहतो की तुम्ही अजुनही Genuine युजर नाही आहात. कधीकधी Genuine युजर्र्सनापण हा मेसेज सतवत राहतो.  त्यांना ह्या कटकटीतून वाचवण्यासाठी मायक्रोसोफ्टने स्वतःच एक नियमावली काढली. व हा प्रॉब्लेम सोडविला. म्हणून फुकट्यांसाठी गुगलवर थोडे शोधले असता हया त्रासातून सुटण्यासाठी मुबलक माहिती मिळाली. त्यातली बरीच माहिती ही विंडोजच्या  cracked व्हर्जन्स बद्दल होती. जी तुमच्या PC साठी डेंजरस असू शकते. म्हणून कोणताही धोका नसलेली…

एक उपयुक्त पद्धत येथे देत आहे. योग्य ती काळजी घेवून ट्राय करायला हरकत नाही.

  1. विन्डोज टास्क मनेजर वर जा.
  2. wgatray.exe ही प्रोसेस बंद करा.
  3. विन्डोज XP सेफ मोड मध्ये रीस्टार्ट करा.
  4. C:\Windows\System32 मधून WgaTray.exe डिलीट करा.
  5. C:\Windows\System32\dllcache मधून WgaTray.exe डिलीट करा.
  6. RegEdit उघडा किंवा लॉन्च करा.
  7. खालील ठिकाणी जा.
    HKEY_LOCAL_MACHINE\SOFTWARE\Microsoft\Windows NT\CurrentVersion\Winlogon\Notify
  8. WgaLogon हा फोल्डर संपूर्णपणे डिलीट करा
  9. विन्डोज XP बंद करून पुन्हा सुरु करा.

पण सध्याचे नवीन व्हर्जनमधील  WGN  टूल थोडे ट्रीकी आहे. तुम्ही ही प्रोसेस बंद केली रे केली की लगेच पुन्हा चालू होते. आणी ती मेमरीत चालू असल्याने डिलीटही होत नाही.

म्हणून हे ट्राय करा.

  • दुसरी स्टेप सोडून द्या.
  • स्टेप 4 वर C:\Windows\System32 मधून WgaTray.exe डिलीटचे कन्फर्मेशन आल्यावर थांबा व नंतर टास्क मनेजर वर जावून wgatray.exe ही प्रोसेस बंद करा.
  • तुम्हाला जेंव्हा ही प्रोसेस बंद करण्यासाठी पुन्हा विचारले जाईल तेंव्हाच तो (wgatray.exe चा) कन्फर्मेशन बॉक्स WgaTray.exe च्या डिलीटच्या कन्फर्मेशन बॉक्सबरोबर मांडा.
  • आणी आता अजिबात वेळ न दवडता आधी टास्क मेनेजर मधील प्रोसेस बंद करा व लगेच डिलीट कन्फर्मेशनला येस करा. (जर तुम्ही चुकलात तर तुम्हाला हे पुन्हा करावे लागेल. जर फटकन करू शकलात तरच फाइल डिलीट होईल.)
  • पाचव्या स्टेपची गरज नाही.
  • सहावी आणी नववी स्टेप सांगितल्याप्रमाणे पूर्ण करा.

वरीलप्रमाणे सर्व सूचना फॉलो केल्यानंतर आता

  • Control Panel > Security Center > Automatic Update Settings. इथे जा.
  • पुढील तिसरे ऑप्शन सिलेक्ट करा. “Notify me but don’t automatically download or install them“.
  • ओके करा.
  • आता जेंव्हा थोड्या वेळानंतर विन्डोज अपडेट्सचा आयकॉन येईल तेंव्हा त्यावर क्लिक करा तिथे असलेल्या अपडेट्स ची एक लिस्ट दिसेल.
  • आता Windows Genuine Advantage Notification च्या चेकबॉक्सला अन् सिलेक्ट करा.(इमेजमध्ये दाखविल्याप्रमाणे)व नंतर डाउनलोड वर क्लिक करा.
  • त्यानंतर “Don’t notify my about these updates again” वर क्लिक करा म्हणजे पुढच्या वेळेस जेंव्हा तुम्ही अपडेट्स डाउनलोड करीत असाल तेंव्हा हा मेसेज तुम्हाला त्रास देणार नाही.

फक्त अपडेट्स डाउनलोड करताना काय डाउनलोड करीत आहात ह्याची काळजी घ्या नाहीतर हे भूत पुन्हा तुमच्या  PC च्या मानगुटीवर बसेल.

  1. WgaLogon हा फोल्डर संपूर्णपणे डिलीट करा
  2. विन्डोज XP बंद करून पुन्हा सुरु करा.