Posts Tagged ‘झम्प्याचा फंडा’


संपूर्ण जगाची अशी कोणती लाडकी प्रोडक्टस आहेत ज्यांच्या नावाचा क्रियापद म्हणूनपण वापर केला जातो? उत्तर फार अवघड नाहीए…बरोबर ना? एक आहेत आपले नेहमीचे गूगलकाका. हल्ली आपण सर्च केले का म्हणून नाही विचारत,आपण विचारतो “गूगल” केले का? आणी जगाचे दुसरे लाड्के प्रोडक्ट आहे अ‍ॅडोबचे फोटोशॉप. (कालच मी माझ्या मित्राचे फोटो़ज् फोटोशॉप केले.) जरी आपण आपल्या भाषेत ही क्रियापदे वापरायला रूळलो नसलो तरी इंग्रजीमध्ये मात्र ही नावे सर्रास क्रियापदांसारखी वापरली जातात. आणी हेच त्यांच्या यशस्वीतेचे, उपयोगाचे आणी विश्वासाचे पुरावे आहेत.

झम्प्याच्या शिकवणीत ह्यातलेच एक प्रोडक्ट शिकण्यास आपण सुरुवात करणार आहोत्…आणी ते आहे अ‍ॅडोब फोटोशॉप..

सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करून घ्या की संपूर्ण फोटोशॉप शिकणे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. त्याची कारणे बरीच आहेत पण सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे फोटोशॉप हे भयंकर मोठे आहे. कीती मोठे ते शब्दात मांडता येणे कठीण आहे, म्हणून तुम्हीच एका मोठ्या अजस्त्र राक्षसाची कल्पना करा. फोटोशॉप नुसते इन्स्टॉल करून ओपन जरी केलेत तरी झम्प्याने राक्षस हाच शब्द का वापरला हे लक्षात येईल. मित्रांनो फोटोशॉपCS5 मध्ये तर ५०० पेक्षा जास्त मेनू कमांड्स आहेत. त्या नुसत्या बघून डोळे पांढरे होतात आणि आता त्या शिकायच्या? अरे बापरे केवढी मोठी शिक्षा केल्यासारखे वाटेल ना तुम्हाला? पण इतके घाबरून जाण्याची काही एक गरज नाही. फोटोशॉप जर खरेच इतके भयंकर वा अवघड असते तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरलेच गेले नसते. उलट एकदा का तुम्ही ह्या राक्षसाबरोबर हात मिळवलात की चक्क त्याच्या प्रेमातच पडता. हे मी तुम्हाला अगदी माझ्या स्वानुभावरून सांगतो. जगातील ९९ टक्के डिजीटल फोटो्ज हे फोटोशॉप या राक्षसाबरोबर रासलीला खेळून आलेले असतात. आणि काय ट्रजेडी आहे बघा. जगाचा जितका विश्वास ह्या राक्षसावर आहे त्याच्या कवडीइतकाही विश्वास ज्याच्यासाठी ह्याचा जन्म झाला त्या फोटोंवर ठेवायला आता जग तयार नाही. हल्लीच्या युगात फोटो हा एकदम नॉनरिलायबल सोअर्स समजला जातो. थँक्स् टू फोटोशॉप. हे म्हणजे अगदी कानामागून आला आणी तिखट झाला अशेच झाले नाही का? असो…आपण आपला उद्योग बघुया.

(थोडे विषयांतर : झम्प्याचा फंडा) झम्प्याला प्रश्न फार आवडतात. आता विचारा का? (बघा परत प्रश्न) कारण जेथे प्रश्न येतो तेथे मागोमाग उत्तरपण येते आणि जेथे उत्तर येते तेथे मागोमाग ज्ञानपण येते (आय नो ज्ञान हा जरा हेवी शब्द आहे पण आता दुसरा सुचत नाहिए) आणी म्हणूनच झम्प्याचे बरेच लेख इतकेच काय परिछेद्पण एखाद्या प्रश्नाने सुरु होतात. आता झम्प्याचा पुढचा प्रश्न. (लाइक करोडपती स्टाईल.)

तुम्हाला फोटो आवडतात का? झम्प्याला ह्याचे उत्तर माहीत आहे पण मुद्दामच विचारतोय. तुम्ही म्हणाल हॅ हा काय प्रश्न आहे..फोटो कोणाला नाही आवडत, १००% सर्वांनाच आवडतात.बरोबर ना. आता नुसते बघायला आवडतात की काढायलापण आवडतात? झम्प्याला माहितीए ह्याचेही उत्तर दोन्हीसाठी १००% होय असेच असणार. बरोबर ना. जरी तुम्ही आतापर्यंत एकही फोटो प्रत्यक्षात क्लिक केला नसेल (जे अश्यक आहे.निदान हा लेख वाचणर्‍यांसाठीतरी) तरी मनातल्या मनात कितीतरी वेळा क्लिक केला असणार. कित्येक वेळा असे वाटले असणार की काश मेरे पास कोइ अच्छा कॅमेरा होता तो मै भी बहोत सारे अच्छे अच्छे फोटो्ज निकालता ( कुठेही गेलो तरी हिन्दी चित्रपटांची भूतं पाठ काही सोडत नाहीत.) हरकत नाही. कॅमेरा जेंव्हा यायचा तेंव्हा येईल सध्या आपण दुधाची तहान ताकावर म्हणजे फोटोशॉपवर भागवूया. आणि जर का तुम्ही फोटो काढत असाल तर मग मात्र कदाचित तुम्ही फोटोशॉपशी झटापटी नक्कीच केली असणार. एनी वे कोणतेही कारण असो वा नसो..कॅमेरा असो वा नसो.. फोटोंवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने एकदातरी ह्या अलीबाबाच्या सॉरी फोटोशॉपबाबाच्या गुहेत नक्की शिरायला हवे. व आपल्या लाडक्या फोटोंचे विश्व जवळून बघयला, हाताळायला,पडताळायला हवे.

तर मग चला मित्रांनो सुरुवात करुया राक्षसाला वश करायची..अरे हा महत्त्वाचे राहिलेच झम्प्या येथे तुम्हाला फोटोशॉप शिकवणार आहे, म्हणजे झम्प्या यातला तज्ञ वगैरे आहे असा तुमचा गैरसमज होवु शकतो तर असे अजिबात समजू नका..झम्प्यादेखिल तुमच्यासारखाच एक शिकाऊ उमेदवार आहे. फरक एवढाच आहे की तो जरा आगाऊ आहे आणि म्हणूनच इथे तुम्हाला शिकवण्याचा आगाऊपणा वगैरे करणार आहे..तरी तुम्ही हे विसरू नका व झम्प्या कुठे चुकलाच तर त्याला मोठ्या मनाने माफ करा. धन्यवाद..

कोणतीही सुरुवात करण्यापूर्वी नक्की कशी सुरुवात करायची? हा मोठा गहन प्रश्न असतो. व तो झम्प्याला नेहमी पडतो. ते बोलतात न “वेल स्टार्ट इज हाफ जॉब डन” म्हणजे योग्य सुरुवात=अर्धी मोहीम फत्ते. ह्या असल्या सुविचारांनी उपयोग होण्यापेक्षा टेंशन येवून नुकसानच जास्त होते. असो. झम्प्याला येथे सध्या प्रश्न पडलाय तो हा की फोटोशॉप शिकवायला कशी सुरुवात करायची? एक एक मेनू किंवा एक एक टूल घेवून शिकवावे की डायरेक्ट एखादी टयुटोरिअल करून दाखवावी? पहीली पद्धत पुस्तकी आणी योग्य आहे पण प्रचंड वेळ खाणारी आहे. दुसरी प्रक्टीकल आणी झट्पट् शिकवणारी आहे. पण काही बेसिक गोष्टी न समजण्याची कींवा दुर्लक्षित होण्याची शक्यता येथे आहे.

तरी सुद्धा येथे झम्प्याला शिकवणीसाठी दुसरी पद्धत योग्य वाटते. कारण झम्प्यांच्या अनेक फंड्यांपैकी एक फंडा असे सांगतो की येथील वाचक हा सुजाण आहे त्याला चमच्याने वगैरे पाणी पाजायची गरज नाही थोड्कयात “समझनेवालोंको इशारा काफी है.” ह्या फिल्मी डायलॉगचा झम्प्या बहोत पुराना फॅन है. असो..

ट्युटोरिअलस् पुढील लेखापसून चालू होतील.