व्हॉट गो् ज अराउंड कम् स अराउंड..


सुमारे दहा एक वर्षांपूर्वी ही गोष्ट झम्प्याला त्याच्या ईमेल मध्ये फॉर्वरर्ड मेल म्हणून आली होती. आणी तीने झम्प्याला जे झपाटले ते अजुन सोडायचे नाव नाही.. ह्या गोष्टीने झम्प्याचा गीतेतील कर्म सिद्धांतावर असलेला विश्वास आणखीनच दॄढ बनविला. तुमची थॉट प्रोसेस बदलू शकणारी, अतिशय हेलावून सोडणारी व अत्यंत प्रेरणादायी अशी ही गोष्ट तुम्ही वेळात वेळ काढून वाचलीच पाहिजे. असा झम्प्याचा आग्रह आहे. नव्हे हट्ट्च आहे असे समजा. व प्लीज वाचा.

व्हॉट गो्ज अराउंड कम् स अराउंड..( जे जाते ते फिरून परत येतेच येते..)

संध्याकाळची वेळ होती. हिवाळ्यामुळे काळोखाने आपले साम्राज्य पसरावायला लवकरच सुरुवात केली होती. तो नेहमीप्रमाणे थकलेला दिवस संपवून शहराच्या बाहेर असलेल्या आपल्या घराच्या दिशेने मंद वेगात चालला होता. रस्ता पण सुनसानच होता. आणी त्यात विशेष असे काहीही नव्हते. हा तसा दुर्लक्षित असाच परिसर होता. भर दिवसादेखिल इथे फारशी वर्दळ नसायची. त्याचे हात यांत्रिकपणे गाडी हाकत होते. डोक्यात मात्र विचारांची समाधी लागली होती. गेले काही दिवस परिस्थीतीशी जुळवून घेताना त्याची व त्याच्या कुटुंबाची फारच ओढाताण झाली होती. जर आताच काही केले नाही तर….आणी इतक्यात अचानक त्याची नजर रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या त्या स्त्रीवर पडली…एवढ्या अंधारातपण त्याने तीच्या चेहर्‍यावरचे हावभाव चट्कन हेरले. ती नक्कीच कोणत्यातरी अड्चणीत असावी व मदतीच्या अपेक्षेने अशी रस्त्यात एकटी उभी असावी. झटकन त्याची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीच्या पॉश मर्सिडीसच्या बरोबर समोर थांबली.

जरी त्याच्या चेहर्‍यावर मंदसे आश्वासक स्मित होते तरी ती मात्र आतून नखशिखांत हादरलेली होती. गेल्या एक दिड तासापासून कोणीच तीच्या मदतीसाठी थांबले नव्हते. तो काही इजा करेल की आणखी काही? कळकटलेले कपडे, चेहर्‍यावर वाढलेली दाढीची खुंटे यामुळे तो नक्कीच गरीब आणी उपाशी दिसत होता. अशा कोणापासून सुरक्षित वाटण्याचा प्रश्नच येत नव्हता. थंडीने कुड्कुडणार्‍या तीला दरदरून फुटु लागला.

तीच्या मनातील भाव ओळखायला त्याला एक नजर पुरेशी होती. एवढ्या थंडीत अशा रस्त्यावर घाबरलेली एकटी स्त्री. “मी इथे तुमच्या मदतीसाठी आलो आहे. एवढ्या थंडीत बाहेर गारठण्यापेक्षा तुम्ही आत गाडीत का नाही बसत? बाय द वे माझे नाव ब्रायन आहे.”

जास्त काही नाही त्या मर्सिडीसचा एक टायर पंक्चर झाला होता. पण एका वयस्कर स्त्रीसाठी ते ही एक मोठे आव्हानच होते. गाडीच्या खाली शिरून टायर बदलायला त्याला फारसा वेळ व कष्ट लागले नाहीत. हां हात थोडे अजून कळकटले व थोडे खरचटलेही पण त्याच्यासाठी त्यात विशेष असे काही नव्हते. एवढ्या वेळात तीच्या मनात त्याच्याबद्दल असलेल्या भीतीची जागा आता कौतुक आणी आभाराने घेतली होती. तीने सांगितले की ती काही कामानिमित्त पुढच्या शहरात निघालेली..आणी असे घडले…त्याचे मनापासून आभार मानून तीने त्याला त्याच्या कामाच्या मोबदल्यात कीती रक्कम देवु असे विचारले..कितीही रक्कम तीच्यासाठी ठीकच होती. जर तो थांबला नसता तर होवू शकणार्‍या भयंकर गोष्टींची कल्पना तीने आधीच केलेली होती.

पण ब्रायनसाठी हे काम असे नव्हतेच मुळी त्यामुळे यात पैशांचा काहे संबंध येतच नव्हता. त्याच्यासाठी हे एका अडचणीत सापडलेल्याला मदत करण्याशिवाय दुसरे काही नव्हते. खूपजणांनी त्याला अशा अडचणींच्या वेळेस मदतीचा हात पुढे केलेला होता. तो आपले संपूर्ण आयुष्यच अशा प्रकारे जगला होता. त्यामुळेच अशा वेळेस दुसर्‍या कोणत्याही प्रकारे वागण्याचे त्याला माहीतच नव्हते.

तो फक्त एवढेच बोलू शकला “जर तुम्हाला खरोखरच परतफेड करायची असेल तर फक्त एवढेच करा जर पुढे कधी कोणी अडचणीत दिसले व तुमच्या मदतीची गरज असली तर तुम्ही त्या अडचणीत असलेल्याला ती मदत करा. आणी…..एकदा माझी आठवण काढा. बस बाकी माझी कसलीही अपेक्षा नाही.”

तीची गाडी सुरु होवून दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच उभा राहीला. आजचा दिवस फार काही चांगला गेला नव्हता त्याचा पण घरी परतताना आता त्याला जरा बरं वाटत होतं.

थोडे मैल अंतर कापल्यावर तीची गाडी एका जुन्या पुरान्या धाब्याटाइप हॉटेलवर थांबली. हॉटेलच्या कॅशकाऊंटरची अवस्था एखाद्या अडगळीत टाकलेल्या सामानासारखीच होती आणी त्यात आश्चर्य वाटण्याजोगेही काही नव्हते. तो रस्ता आणी परिसर यांसकडून आणखी अपेक्षापण व्यर्थ होती. दुसर्‍या एखाद्या वेळेस ती स्त्री अशा ठिकाणी थांबलीपण नसती पण घडलेला प्रसंग आणी पुढील प्रवास यामुळे तीला थोडे ताजेतवाने होवून निघायचे होते. काहीतरी खाण्यासाठी ती आत शिरली. आतील वातावरण तर तीच्यासाठी एकदम अनोळखीच नव्हे तर त्रासदायकही होते. एवढ्यात एक वेट्रसेस तीच्या ओल्या केसांसाठी एक स्वच्छ टॉवेल घेवून आली. तीच्या चेहर्‍यावर गोड प्रसन्न स्मित होते जे दिवसभर उभे राहून दमलेल्या पायांनी पण पुसले गेले नव्हते. त्या स्त्रीच्या पटकन लक्षात आले की ती वेट्रेसेस आठ महीन्यांची तरी गरोदर आहे. पण तीने ह्या त्रासाचा तीच्या चेहर्‍यावर आणि वृत्तीवर कसलाही फरक पडू दिला नव्हता.

ती वयस्कर स्त्री मोठ्या आश्च्रर्याने विचार करू लागली की स्वतःजवळ असे काहीही नसताना कोणी अनोळख्या व्यक्तीला इतके कसे काय देवु शकते? आणी तीला ब्रायनची आठवण झाली. खावून झाल्यानंतर आणी ती वेट्रेसेस तीच्या १०० डॉलरच्या बिलाचे पैसे सुट्टे घ्यायला गेलेली असताना ती स्त्री लगबगीने दरवाजातून बाहेर पडली. वेट्रेसेस परत येईपर्यंत ती निघूनदेखिल गेली होती. वेट्रेसेस आश्च्रर्याने त्या स्त्रीला इकडेतिकडे बघू लागली. आणी अचानक तीची नजर त्या टेबलवरच्या नॅपकीनवर पडली. त्याच्यावर त्या स्त्रीने जे लिहिलेले होते ते वेट्रेसेसने वाचायला सुरवात करताच तीचे मन भरून आले आणी डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लिहीले होते. “तु मला काही देणे लागत नाहीस्. एकदा मीदेखिल अशीच तुझ्या जागी होते आणी अशीच कोणीतरी मला मदत केली होती. मी देखिल तुला तशीच मदत करित आहे. जर तुला खरंच परतफेड करायची असेल तर मग तू एक काम कर ही प्रेमाची साखळी तुझ्याइथे संपून देवू नकोस.

नॅपकीनच्या खाली १०० डॉलरसचे आणखी चार बिलस होते.

तिथे आणखी टेबलस साफ करायची होती, अजून लोकांना सर्व्ह करायचे होते, बरेच काम बाकी होते. तीने ते इतर कोणत्यातरी दिवशी केले. त्या रात्री मात्र जेंव्हा ती घरी येवून अंथरूनात शिरत होती तेंव्हा तीच्या डोक्यात त्या स्त्रीने दिलेल्या पैशांचा आणी त्या लिहिलेल्या वाक्यांचाच विचार चालू होता. जेंव्हा पुढच्या महीन्यात घरात बाळ येणार आहे तेंव्हा मला व माझ्या नवर्‍याला या पैशांची कीती गरज आहे हे त्या स्त्रीला कसे समजू शकते?

तीला हे चांगलेच माहीत होते की तिचा नवरा कीती काळजीत असायचा आणी घरासाठी कीती कष्ट करायचा. रात्री जेव्हा तो थकूनभागून अंथरूनात कलंडलेला होता तेव्हा त्याच्या गालावर हळूच किस करून ती कुजबुजली “काळजी करू नकोस ब्रायन सर्व काही ठीक होईल.”

——————————————————————————————————————————————————

ह्या झपाट्लेल्या गोष्टीचे “मोराल” सांगायची अजिबात गरज झम्प्याला वाटत नाहीए.

झम्प्या वाट पहातोय आता तुमच्या प्रतिक्रियेची….

प्रतिक्रिया
  1. Ajay म्हणतो आहे:

    तो फक्त एवढेच बोलू शकला “जर तुम्हाला खरोखरच परतफेड करायची असेल तर फक्त एवढेच करा जर पुढे कधी कोणी अडचणीत दिसले व तुमच्या मदतीची गरज असली तर तुम्ही त्या अडचणीत असलेल्याला ती मदत करा. आणी…..एकदा माझी आठवण काढा. बस बाकी माझी कसलीही अपेक्षा नाही.”

    Sundar Khup chan

    jabardast

    mast

    wa wa wa wa

  2. झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

    अजय थांकु थांकु वेरी मच.

  3. Mangesh Mane म्हणतो आहे:

    great yaar phar……….sorry sorry zhampya kasa suchta tula he …..sorry jara ushirach zala vachayla pan mhantat na …………..der he tandurust………asa kahi tari

Leave a reply to Mangesh Mane उत्तर रद्द करा.