गौरीपूजन, महालक्ष्मी, दुर्वाष्टमी….आपले सण समजून घ्या

Posted: सप्टेंबर 12, 2010 in आपले सण समजून घ्या
टॅगस्, , , , , , , , , , , , , ,

गौरीपूजन, महालक्ष्मी, दुर्वाष्टमी


जेथे ज्ञान असते तेथे समृद्धी वसते. ज्ञान तेथे समृद्धी हे त्रिकालाधित सत्य आहे. हेच सूत्र आपल्याला भाद्रपद महिन्यात दिसून येते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण ज्ञानाचा देव म्हणून गणपतीची पूजा करतो, पंचमीला आपल्याला ज्ञान देणाऱ्या ऋषींची पूजा करतो पाठोपाठ अष्टमीला समृद्धीदेवता महालक्ष्मी, गौरीची पूजा करतो.

प्राचिन काळी महिषासूर आणि बेलासूर या राक्षसांचा महालक्ष्मीने नाश केला म्हणून तिला महिषासूरमर्दिनी म्हणतात. या कृतज्ञतेची जाणीव ठेवण्यासाठी महालक्ष्मीचा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सवात गौरीचेही पूजन केले जात असल्याने महालक्ष्मी व गौरी दोघींचीही एकत्र पूजा करण्याची परंपरा आहे.

हा उत्सव भाद्रपद शुद्ध अष्टमीला सुरु होत असल्याने या तिथीला ‘दुर्वाष्टमी’ म्हणतात. या दिवशी दुर्वांची पूजा करितात. दुर्वांप्रमाणे वंशवेल वाढत राहवी अशी धारणा त्यामागे आहे.

महालक्ष्मी हि अतिशय जागरूक देवता मानली जाते. हि समृद्धीची तसेच शौर्याची देवता आहे. जिथे ज्ञान तिथे समृद्धी त्याच्या रक्षणासाठी शौर्य आवश्यकच. अशाप्रकारे महालक्ष्मीचे व्रत म्हणजे आपल्या संस्कृतीतील स्त्रियांच्या समृद्धीला, शौर्याला असलेले महत्वच होय.

——————————————————————————————————————————————————

खालील सणांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

गणेश चतुर्थी हरतालिका

——————————————————————————————————————————————————Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere

यावर आपले मत नोंदवा